पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी 'त्या' बसचालकाचा का केला उल्लेख?

दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी बसचालक राज बहादूर यांचे मानले आभार
rajinikanth with raj bahadur
rajinikanth with raj bahadur
Updated on

"कर्नाटकातील माझा मित्र, बसचालक, माझा सहकारी.. राज बहादूर Raj Bahadur. मी जेव्हा बस कंडक्टर म्हणून काम करत होतो, तेव्हा त्याने माझ्यातील अभिनयकौशल्य ओळखळं आणि मला अभिनयसृष्टीत काम करण्यास प्रोत्साहित केलं", असे उद्गार भारतातील अत्यंत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार Dadasaheb Phalke Award मिळाल्यानंतरच्या भाषणादरम्यान अभिनेते रजनीकांत Rajinikanth यांनी काढले. पी राज बहादूर हे ७६ वर्षीय बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमधील (BMTC) सेवानिवृत्त बसचालक आहेत. कॉर्पोरेशन बनण्यापूर्वी राज बहादूर हे बेंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये (BTC) काम करत होते आणि तेव्हा रजनीकांत कंडक्टर होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी रजनीकांत यांच्यामधील अभिनयकौशल्याला ओळखलं आणि त्यांना सिनेसृष्टीत जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.

रजनीकांत यांना पुरस्कार मिळाल्याच्या काही मिनिटांनंतर, राज बहादूर हे आपल्या मित्राला भेटण्यासाठी चेन्नईला जाण्याची तयारी करत होते. “पुरस्कार स्वीकारताना माझं नाव घेण्याची खरंतर गरज नव्हती. पण यावरून त्याची नम्रता आणि तो आपला इथपर्यंतचा प्रवास विसरला नाही हे लक्षात येतं. तो त्याच्या मित्रांना कधीही विसरत नाही, कारण त्यांनीच त्याला आजवर प्रोत्साहन दिलं आहे. तो जेव्हा कधी बेंगळुरूला येतो तेव्हा तो त्याच्या मित्रांना आवर्जून भेटतो”, असं राज बहादूर म्हणाले.

rajinikanth with raj bahadur
थलायवाचा गौरव, रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित

रजनीकांत यांच्याविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, "तो इतरांप्रमाणेच सामान्य कंडक्टर असला तरी, त्याच्यात एक वेगळीच चमक होती. कामगार संघटनेने आयोजित केलेल्या नाटकांमध्ये आम्ही त्याचं अभिनय पहायचो. तो नेहमी मुख्य भूमिकेत असायचा. पण मोठा अभिनेता होण्याचं स्वप्न त्याचं कधीच नव्हतं. चित्रपटसृष्टीत काम करण्यात त्याला अजिबात रस नव्हता. पण मी त्याला प्रोत्साहित केलं आणि त्यानंतर तो मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी गेला. एका कार्यक्रमात, रजनीने एका नाटकात अभिनय केलं होतं आणि त्या नाटकात दिग्गज तमिळ दिग्दर्शक के बालचंदर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रजनी बेंगळुरूला आला आणि मला सांगितलं की बालचंदरने त्याला तमिळ शिकायला सांगितलं, पण त्याविषयी फार काही बोलले नाही. मी त्याला म्हणालो, एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने सांगितलं असेल तर नक्कीच पुढे काहीतरी काम असेल. मला तमिळ बोलता येत असल्याने तेव्हापासून आम्ही फक्त तमिळमध्येच बोलायचं ठरवलं. पुढील दोन महिन्यांत रजनीकांत तामिळ अस्खलितपणे बोलू लागला.”

"पुढच्या वेळी जेव्हा रजनी दिग्दर्शकाला भेटला, तेव्हा बालचंदर यांनी त्याला तमिळ येत नसल्याने भूमिका देणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यावर लगेचच रजनीने त्यांना तामिळमध्ये उत्तर दिलं की मला ही भाषा माहित आहे. अवघ्या दोन महिन्यांत रजनीची भाषा शिकण्याची क्षमता पाहून ते थक्क झाले होते. अशा पद्धतीने त्याला १९७५ मध्ये अपूर्व रागांगलमध्ये भूमिका मिळाली. तेव्हापासून, त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही”, राज बहादूर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.