Who is Sarah rose Hanbury : कोण आहे 'लेडी रोझ हॅनबरी'? सूनबाईंच्या फेक फोटोनंतर 'इंग्लंडचे राजघराणे' पुन्हा आले गोत्यात

२००९ मध्ये साराचं लग्न डेव्हिड रॉकसेव्हेजसोबत झालं आणि तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं.
 Sarah rose Hanbury
Sarah rose Hanbury esakal
Updated on

Who is Sarah rose Hanbury prince William : कुणी काही का म्हणेना पण केट गेट प्रकरणानं जगभरातील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांना चकित केलं होतं. केटनं सोशल मीडियावर साराचा रोझ हॅनबरीचा फोटो पोस्ट करणं नेमकं काय सांगून जाणारं होतं याविषयी नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

केटनं तो फोटो पोस्ट करुन जेवढी लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढ्याच प्रमाणात तिला ट्रोलही केले जात आहे. एखाद्या राजघराण्या संबंधित असणाऱ्या व्यक्तिंनी अशा प्रकारे फोटो मॉर्फ करणे किंवा ते सोशल मीडियावर शेयर करणे कितपत योग्य आहे असे प्रश्न नेटकऱ्यांनी केटला विचारले आहेत. वास्तविक या दोन राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारे सोशल मीडियावर एकमेकांचे प्रतिमा हनन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. केट अन् राजपुत्र विल्यम यांचा दरारा काही वेगळाच आहे.

पण लेडी सारा रोझ नेमकी आहे तरी कोण?

ब्रिटिश शाही परिवाराशी संबंधित असणाऱ्या कुटूंबात साराचा जन्म झाला आहे. पूर्वपरंपार चालत आलेल्या ब्रिटिश राजघराण्याशी मोठा संबंध जो पिढीजात सुरु आहे त्याचे प्रतिनिधीत्व सारा करते. तिची आजी म्हणजे साक्षात लेडी एलिझाबेथ लॅम्बर्ट. राणी एलिझाबेथ सेकंडच्या लग्नाची मोठी चर्चा रंगली होती.सारा ही रॉयल फॅमिलीशी संबंधित आहे.

लेडी साराचा जो प्रवास आहे तो स्टो स्कूल आणि ओपन युनिव्हर्सिटी पासून सुरु होतो. त्यानंतर तिनं फॅशन जगतामध्ये प्रवेश केला आणि स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. त्यात तिनं वेगवेगळ्या मॉडेलशी स्पर्धा करत तिचंही वर्चस्व तयार केलं. तसेच स्थानिक खासदार मायकल ग्रोव्ह सोबत तिनं पॉ़लिटिकल रिसर्चमध्ये देखील सहभाग घेतला होता.

 Sarah rose Hanbury
Salman Khan : 'वॉर २' अन् 'पठाण २' मधून 'टायगर'चा पत्ता कट? 'कॅमिओ'मध्ये दिसणार नाही, हे आहे कारण?

२००९ मध्ये साराचं लग्न डेव्हिड रॉकसेव्हेजसोबत झालं आणि तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. डेव्हिड हा मार्कस चोलमोंडेलशी संबंधित आहे. त्याला मार्चिओनिस पदवी गौरविण्यातही आले आहे. असं म्हटलं जातं की, साराचं घर हे प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटोन यांच्या अनमेर हॉलपासून नजीकच होतं. त्यामुळे सारा ही त्या हॉलमध्ये जे मोठे सोहळे, कार्यक्रम पार पडत त्यात सहभागी होत असे. बकिंगहॅम पॅलेसमध्ये २०१७ रोजी झालेल्या कार्यक्रमातही ती झळकली होती. यावेळी ती प्रिन्स हॅरीच्या पुढे बसली होती.

किंग चार्ल्स दुसरा ओआणि क्वीन कॅमेला यांचा राज्याभिषेक होता त्यावेळी देखील रोझचं दिसणं हे अनेकांच्या नजरेत भरलं होतं. ती आता चर्चेचा विषय झाली होती. प्रिन्स विल्यम हा मोठ्या अडचणीत सापडला होता जेव्हा त्यानं केट अन् रोझ हॅनबरी यांना फसवले अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर जेव्हा प्रिन्स आणि रोझचा फोटो व्हायरल झाला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता.

 Sarah rose Hanbury
Sidhu Moose Wala: "आमच्या कुटुंबाची काळजी करणाऱ्या..."; पत्नीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोस्ट

कुणी काही म्हणेना पण प्रिन्स विल्यम आणि केटचे रिलेशन हे खूपच स्ट्राँग असल्याचे बोलले जाते. ते सध्या त्यांच्या तीन मुलांच्या संगोपनात व्यस्त आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर जे काही बोलले जात आहे त्या बऱ्याचशा वावड्या असल्याची चर्चा आहे.

केटचं गैरहजर राहणं यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या तर्क वितर्कांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर साराह रोझविषयीच्या चर्चा देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या सगळ्यात विल्यम आणि लेडी सारा रोझच्या अफेयरच्या बातम्या प्रतिक्रियांचा विषय आहे. त्याविषयी या सेलिब्रेटींकडून अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.