बॉलीवूडमध्ये 'कपूर' नावाला मोठं वजन आहे. म्हणूनच 'कपूर'(Kapoor) आडनाव(Surname) असलं की बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणं सोपं जातं असं म्हटलं जातं. पण जितेंद्र (Jeetendra) यांच्याबाबतीत मात्र हे थोडं उलटं आहे. कारण त्यांना सिनेइंडस्ट्रीत येण्यासाठी केवळ त्यांच्या कपूर आडनावाचा त्याग करावा लागला नाही तर त्यांना त्यांचे नावही बदलावे लागले. जितेंद्र यांचे ओरिजनल नाव होते रवी कपूर. आता ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की भले जितेंद्र यांनी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी नाव सोडलं पण त्यांच्या मुलांनी म्हणजे तुषार कपूर,एकता कपूरनं आपलं ओरिजनल नाव आहे तसंच ठेवलं. एक सिनेमाच्या पडद्यावर तर दुसरा पडद्यामागे यशस्वी झाला.(Why did Jeetendra change his name? read)
जितेंद्र हे मध्यवर्गीय पंजाबी कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील अमरनाथ कपूर हे छोटे व्यावसायिक होते. ते फिल्म स्टुडिओमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी सप्लाय करायचे. ते जवळ-जवळ मुंबईतले सगळे स्टुडिओ पालथे घालायचे,पण व्ही.शांताराम यांचा राजकमल स्टुडिओ त्यांचं फेव्हरेट ठिकाण होते. जितेंद्र यांचे वडील जवळ-जवळ सर्वच स्टुडिओमध्ये चक्कर मारायचे त्यानिमित्तानं अनेक हिरोंना भेटायचे,आणि नकळत मग आपल्या मुलाची तुलना त्या हिरोंसोबत करायचे. त्यांना वाटायचं की माझा मुलगा या सगळ्यांत उजवा आहे. ते रवी म्हणजे जितेंद्र यांचा फोटो आपल्या खिशात ठेवायचे. सुरुवातीला ते लोकांना जितेंद्र यांचा फोटो दाखवायला थोडो हिचकिचायचे पण एकदा त्यांनी व्ही.शांताराम यांना रवी उर्फ जितेंद्र यांचा फोटो दाखवलाच. शांताराम यांनी जितेंद्र यांच्या वडीलांना तुझ्या मुलाला अभिनय करायला आवडेल का? असा प्रश्न केला. जितेंद्र यांच्या वडीलांनी तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता 'हो' म्हणून टाकलं.
त्यावेळी व्ही.शांताराम 'सेहरा' सिनेमा बनवत होते. त्यांनी अमरनाथ कपूर यांना दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मुलाला स्टुडिओला घेऊन ये असा निरोप दिला. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र आपल्या वडीलांसोबत गेले तेव्हा शांताराम यांनी जितेंद्र यांना ज्युनिअर आर्टिस्टचे काम दिले. आणि जयपूरला घेऊन गेले. त्यावेळी जितेंद्र यांना एक धोती-कुर्ता घालायला सांगून एका गर्दीच्या सीनमध्ये पाठवलं. शांताराम यांची नजर जितेंद्र यांच्यावरच होती. शूटिंगवरनं परत आल्यावर एके दिवशी पुन्हा व्ही.शांताराम यांनी अमरनाथ कपूर यांना आपल्या मुलाला घेऊन स्टुडिओत यायला सांगितले. जेव्हा जितेंद्र आले तेव्हा व्ही.शांताराम अमरनाथ यांना म्हणाले,''मी एक सिनेमा बनवत आहे. ज्यात माझी मुलगी राजश्री अभिनेत्री आहे,आणि रवी म्हणजेच जितेंद्रला मी हिरो बनवत आहे''. तो सिनेमा होता,'गीत गाया पत्थरोंने'.
व्ही.शांताराम यांनी अमरनाथ कपूर यांच्या मुलाला रवीला हिरो तर बनवलं,पण त्याचं नाव त्यांना खूप साधं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी रवी कपूरला(Ravi Kapoor) नवीन नाव दिले ते म्हणजे जितेंद्र. जितेंद्र यांनी त्या सिनेमात एका मूर्तीकाराची भूमिका बजावली होती. त्या सिनेमाची गाणी तर हिट होतीत पण सिनेमानेही चांगला बिझनेस केला. पण त्यानंतर जितेंद्र यांचे काही सिनेमे सपशेल आपटले. जितेंद्र यांना यश तेव्हा मिळालं जेव्हा सुंदरलाल नहाटा या साऊथ निर्मात्याची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी जितेंद्र यांना एका साऊथ सिनेमाच्या हिंदी रिमेकसाठी साइन केलं. तो सिनेमा सुपरहिट ठरला. तेव्हापासून जितेंद्र साऊथ सिनेमांचे हिंदी रीमेक बनवणाऱ्या साऊथच्या निर्मात्यांचे फेव्हरेट हिरो बनले. मग तिथून पुढे मात्र जितेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.