Prajakta Mali: उद्घाटनाला राज.. ब्रँडच्या नावातही राज.. काय आहे प्राजक्ता माळीचं 'राज' कनेक्शन?

प्राजक्ता माळीने 'प्राजक्तराज' या नव्या ब्रँडच्या उद्घाटनाला मध्ये अनेक गुपितं उघड केली.
why prajakta mali gave prajaktaraaj name for her jewellery brand opening by raj thackeray
why prajakta mali gave prajaktaraaj name for her jewellery brand opening by raj thackeraysakal
Updated on

prajakta mali: आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे.

(why prajakta mali gave prajaktaraaj name for her jewellery brand opening by raj thackeray)

why prajakta mali gave prajaktaraaj name for her jewellery brand opening by raj thackeray
Bigg Boss Marathi 4: अपूर्वाला विजयी करा! फॅन्सने मुंबईभरात झळकवलेत बॅनर..

अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत.

why prajakta mali gave prajaktaraaj name for her jewellery brand opening by raj thackeray
Ved Movie Box Office Collection: 'वेड'नं खरंच वेडं केलंय! एका आठवड्यात २० कोटींची कमाई..

या वेळी प्राजक्ताने उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे यांना बोलवणे काही नवीन नव्हते, कारण ती गेली अनेक दिवस राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे. ती त्यांच्या सभेलाही जाते. शिवाय राज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातही ती असते, त्यामुळे तिचे राज ठाकरेंवरील आदर आणि प्रेम जाहीर आहे. त्यामुळे या सोहळ्याला राज ठाकरे असणारच ही अनेकांना माहीत होते, पण तिच्या ब्रॅंडचे नाव 'प्राजक्तराज' असल्याने जेव्हा समोर आले तेव्हा मात्र अनेकांचे डोळे चमकले.

ब्रँडच्या नावातही 'राज' आणि उद्घाटनालाही 'राज' असा प्रश्न अनेकांना पडू लागला. यामध्ये नेमकं काय 'राज' कनेक्शन आहे ही अनेकांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पत्रकारांनी तिला हा प्रश्न विचारलाच की नेमकं 'राज' कनेक्शन काय आहे?

त्यावर प्राजक्ताने अगदी वेगळं उत्तर दिलं. ती म्हणाली.. ''खरतर सगळ्यांनी या ब्रँडचं नाव 'प्राजक्तसाज' असं सुचवलं होतं. पण हे नाव न निवडता मी 'प्राजक्तराज' हे नाव निवडलं. 'प्राजक्तसाज' हे नाव छान आहे पण ते थेट लक्षात आलं असतं की हा एखाद्या दागिन्यांचा ब्रँड आहे, म्हणून हे नाव ठेवलं नाही.''

पुढे ती म्हणाली, ''प्राजक्तराज'' ठेवलं कारण 'राज' या शब्दात एक वजन आहे, भारदस्तपणा आहे. तो शब्द उच्चरताच भारी वाटतं. कुठल्याही शब्दाला राज शब्द जोडला की त्याचं वजन वाढतं. उदाहरणार्थ आपण एखादा खूप देखणा असेल तर त्याला राजबिंडा असं म्हणतो. माझ्या दागिन्यांचंही तसंच आहे. म्हणून मी ''प्राजक्तराज'' हे नाव निवडलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.