दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेयर यंदा गुजरातला! बॉलीवूडचं काही खरं नाही...

यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे
69th filmfare award
69th filmfare awardsakal
Updated on

- आरती भुजबळ

Film Award : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोकृष्ट कलागुणांचा गौरव करणारा तारांकित सोहळा काही दिवसात पार पडणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने ६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड २०२४, हा २७ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे.

यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या तपशिलांचे अनावरण करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

69th filmfare award
Karan Johar Modi Biopic : 'श्रीदेवी अन् पीएम मोदी यांच्यावर बायोपिक केला तर कुणाला संधी देशील', करणनं कुणाचं घेतलं नाव?

पत्रकार परिषदेला करण जोहर, जान्हवी कपूर, वरुण धवन उपस्थित होते. त्यांच्यासोबत रोहित गोपकुमार आणि पॅनेलचे इतर सदस्य ही उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वरुण आणि जान्हवीने दीप प्रज्वलन करून केली. अनेक स्टार्स या अवॉर्ड मध्ये सहभागी होणार आहेत. तसेच करीना कपूर ही या सोहळ्यात धमाकेदार परफॉम करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

69th filmfare award
Bollywood च्या 'या' अभिनेत्रीला लोक 'देवी' मानून पुजायचे, कोण आहे ही अभिनेत्री?

या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड्स हा दोन दिवसीय सोहळा असणार आहे. शंतनू आणि निखिल यांचा फॅशन शो आणि पार्थिव गोहिल यांचा संगीत कार्यक्रम पार पडणार आहे.

यंदा सूत्रसंचालनाची जबाबदारी करण जोहर, आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

69th filmfare award
69th Filmfare Awards Nomination: अ‍ॅनिमलवर भारी पडणार सनीपाजी? 'फिल्मफेयर' नॉमिनेशनची घोषणा, यंदा मध्ये कुणी मारली बाजी?

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना करन जोहरने सांगितले की, "२००१ मध्ये झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यावेळेस मी सर्वप्रथम सूत्रसंचालन केले होते. तेव्हापासून सूत्रसंचालक म्हणून माझा प्रवास सुरू झाला. यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड्सशी मी भावनिकरित्या जोडलो गेलो आहे. संस्कृती, परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असल्याने या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे.''

६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४ च्या नामांकानाच्या यादीमध्ये सर्वश्रेष्ठ फिल्मच्या श्रेणीत अॅनिमल, जवान, पठान,ओएमजी २, १२वी फेल, रॉकी और राणी की प्रेम कहाणी यांचा समावेश आहे.

तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री श्रेणीमध्ये कियारा आडवाणी, दीपिका पादुकोण, तापसी पन्नू, राणी मुखर्जी यांचा समावेश आहे.

https://www.esakal.com/health-fitness-wellness/health-tips-dr-vishwajit-mankar-article-on-hemorrhoids-symptoms-bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.