Manoj Bajpayee News: गौतम बुद्धांच्या दृष्टीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे व काळाच्या चाकोरीवर मात करून तो संदेश आजही तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे. परंतु, गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत.
ह्या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी सीक्रेट फ्रँचायजीच्या तिस-या भागासह परत आले आहे - 'सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,' डिस्कव्हरी+ वर 22 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होईल व डिस्कव्हरी चॅनलवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होईल..
नीरज पांडे व फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेल्या व वैविध्यपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व पद्मश्री पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी ह्या डॉक्युमेंटरीला हॉस्ट करेल व त्यामध्ये दर्शकांना बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल नवीन माहिती मिळेल.
शोजचे निर्माता नीरज पांडे ह्यांची निर्मिती असलेल्या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये गौतम बुद्धांच्या शेवटच्या दिवसांभोवती असलेल्या रहस्यांना व आधुनिक काळात बौद्ध धर्मामध्ये केंद्रस्थानी असलेल्या असलेल्या अवशेषांच्या रहस्याला उलगडले जाईल.
त्यामध्ये ह्या अवशेषांच्या मागे असलेले त्यांचे मूळ, सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामागे असलेल्या अध्यात्मिक कहाण्या ह्यांचा शोध घेतला जाईल आणि जगभरात त्यांचा झालेला प्रसार व बौद्ध धर्माला जगातील चौथा सर्वांत मोठा संप्रदाय बनवण्यामध्ये त्यांची भुमिका ह्याचाही शोध घेतला जाईल.
अवशेषांविषयी अधिक खोलवर जाऊन त्यांचे वर्गीकरण शोधणा-या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये बौद्ध धर्मातील त्यांच्या भुमिकेला व्यापक प्रकारे लक्षात घेण्यासाठी ऐतिहासिक व पौराणिक दृष्टीकोनांना एकत्रि प्रकारे बघितले जाईल.
पहिल्या दोन 'सीक्रेटस' मालिकांच्या यशामुळे बौद्ध धर्मातील अध्यात्मिक व सांस्कृतिक घटकांचा आणखी शोध घेण्याची प्रेरणा मिळाणार आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबतच्या ह्या भागीदारीमुळे अधिक मोठ्या, अधिक चांगल्या व अधिक धाडसी कहाण्या समोर मांडू शकतो.
मनोज वाजयेपी ह्यांनी हॉस्ट केलेली "सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स" डिस्कव्हरी+ वर 22 जानेवारी 2024 रोजी आणि डिस्कव्हरी चॅनलवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.