चूल आणि मूल यात अडकलेल्या महिला आज आपल्या कर्तृत्वाने जगभरात भरारी घेत आहे. घरात राबणाऱ्या आईपासून ते आयुष्यात अनेक वळणावर अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात आणि कळत नकळत आपल्याला घडवत असतात. अशा सर्व महिलच्या कामाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन.
हा दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने स्त्री शक्तीचा मोठा जागर पाहायला मिळतो. जवळपास आठ दिवस आधी म्हणजे 3 मार्च 8 मार्च दरवर्षी महिला दिन सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम, सोहळे केले जातात. असाच सोहळा आता पडद्यावरही पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या महिला दिना निमित्त 'झिम्मा' आणि 'हिरकणी' हे दोन दमदार चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहेत. येत्या 3 मार्च पासून ते 8 मार्च पर्यन्त हे चित्रपट आपल्याला पाहता येणार आहेत.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सुपरहिट चित्रपटाने मागील वर्षी प्रेक्षकांना विशेषतः महिलांना वेडं लावले होते. हा आनंद पुन्हा एकदा महिलांना अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आठवड्यावर चित्रपटगृहांत झळकणार आहे.
या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी ची प्रमुख भूमिका असलेला 'हिरकणी' हा चित्रपट 24 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचलेली हिरकणी कविता ते चित्रपट हा प्रवास सर्वांनाच थक्क करून गेला.
त्या हिरकणीने केवळ आपल्या बाळासाठी गड उतरला नाही तर ती सर्व मर्यादा तोडून आपल्या ध्येयापर्यंत गेली. त्याच हिरकणीची संघर्षगाथा प्रसाद ओक यांनी पडद्यावर आणली. आता पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.