Kshitij Patvardhan: लेखक-गीतकार दिसत नाहीत का.. या पुरस्कारावर क्षितीज पटवर्धन भडकला..

लेखक - गीतकार क्षितिज पटवर्धन याने एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपली खंत मांडली आहे.
writer kshitij patwardhan angry post on zee talkies maharashtracha favorite kon 2022 award
writer kshitij patwardhan angry post on zee talkies maharashtracha favorite kon 2022 awardsakal
Updated on

kshitij patwardhan : नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात चौफेर लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धन याने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट बरीच वायरल होत आहे. या पोस्टमध्ये क्षितिजने एका कवितेतून आपली खंत मांडली आहे. अत्यंत सूचक शब्दात त्याने एका पुरस्कार सोहळ्यावर ताशेरे ओढले आहेत.

(writer kshitij patwardhan angry post on zee talkies maharashtracha favorite kon 2022 award

writer kshitij patwardhan angry post on zee talkies maharashtracha favorite kon 2022 award
John Abraham Birthday: वीस वर्षात जमवली कोट्यावधींची संपत्ती.. जॉनने मोडले सगळेच रेकॉर्ड..

एखाद्या कलाकृतीचे कौतुक करताना त्यातील कलाकारांचे, संगीताचे, दिग्दर्शकाचे भरभरून कौतुक केले जाते. पण लेखक आणि गीतकाराचा यथोचित सन्मान होताना दिसत नाही. पुरस्कार असो किंवा त्याची दखल घेणं इथे लेखक आणि गीतकार हे दोन घटक कायमच दुर्लक्षित राहिलेले दिसतात. याच गोष्टीवर आज क्षितिज पटवर्धनने आपले मत व्यक्त केले आहे.

writer kshitij patwardhan angry post on zee talkies maharashtracha favorite kon 2022 award
Sumeet Raghvan: आम्ही बोंबलतोय, विणवण्या करतोय.. पण.. सुमीत राघवनचा थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न

नुकतेच 'झी टॉकीज'च्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण.. या पुरस्कार सोहळ्याची नामांकन यादी जाहीर झाली. परंतु यामध्ये लेखक - गीतकारां साठी एकही पुरस्कार नाही. जो लेखक ती कलाकृती घडवतो, ज्याच्यामुळे ती लोकांची फेवरेट होते त्यालाच या पुरस्कारातून डावलल्याने क्षितिजने एका पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

यामध्ये क्षितीज म्हणाला आहे, 'महाराष्ट्राल फेवरेट गायक आहे, गायिका आहे, संगीतकार आहे, गीतकार नाही... महाराष्ट्राला फेवरेट चित्रपट आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक नाही... गाण्यातून शब्द काढून बघा, सिनेमातून संवाद काढून बघा, आणि सांगा ते फेवरेट होतील का?.. लेखक आणि गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर महाराष्ट्राचे कसे होणार?' असे सडेतोड भाष्य त्याने केले आहे.

पुढे तो म्हणाला, 'काय वाटतं तुम्हाला? अजून दोन कॅटेगरी वाढवून लेखक आणि गीतकार यांनाही तितकंच मानाचं स्थान दिलं तर…' त्याच्या या पोस्टवर कलाकारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हेमंत ढोमे, ईशा केसकर, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या कलाकारांनी त्याला सहमती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.