कन्नड सुपरस्टार यशचा(Yash) काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'KGF2' सिनेमानं बॉक्सऑफिसवर आतापर्यंत चांगलीच कमाई केली आहे. भारतभरातच नाही तर जगभरातनं या सिनेमावर चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर सिनेमाचे संवाद चांगलेच व्हायरल झाले आहेत. साऊथस्टार यशनं साकारलेल्या रॉकी भाईच्या 'वॉयलैंस,वॉयलैंस' संवादांवर तर खूप मीम्स आणि रील्सचा सोशल मीडियावर नुसता धो-धो पाऊस पडत आहे.
खूप कमी लोकांना माहित आहे की सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी यशला डबिंग आर्टिस्ट सचिन गोळेनं (Sachin Gole) आवाज दिला आहे. सचिन जवळ-जवळ १७ वर्ष डबिंग आर्टिंस्ट म्हणून काम करीत आहे. केजीएफ सिनेमापूर्वी देखील त्यानं अनेक साऊथच्या सिनेमांना आवाज दिला आहे. आम्ही सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून सचिनशी खास संवाद साधला. त्यात पनवेलजवळच्या छोट्याशा गावातनं आपला संघर्ष कसा सुरु झाला याविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. त्यानं केजीएफ सिनेमाचं डबिंग करण्याची संधी नेमकी आपल्याला कशी मिळाली याविषयी अनेक इंट्रेस्टिंग खुलासे केले आहेत. सिनेमाविषयी बोलताना सचिन म्हणाला, ''केजीएफ १ साठी मी डबिंग केलं होतं,पण तरीही यशनं स्वतः माझं ऑडिशन घेऊन 'केजीएफ २' च्या रॉकीच्या आवाजासाठी माझी निवड केली. पण तो प्रवास नेमका कसा घडला हे सचिन कडूनच जाणून घ्यायचं असेल तर इथे बातमीत डबिंग आर्टिस्ट सचिन गोळेच्या बातमीची लिंक जोडली आहे,ती नक्की ऐका.
सचिन म्हणाला आहे,''यशला खरंतर केजीएफ २ फक्त कन्नडमध्येच प्रदर्शित व्हावा असं वाटत होतं. पण बाहुबली सिनेमाला हिंदीत यश मिळाल्यानंतर 'केजीएफ२' हिंदीत डब करण्यासाठी तो तयार झाला''. पण आता प्रश्न होता यशसाठी कोण डबिंग करणार? कोणाचा आवाज त्याला सूट होईल. त्याला एक असा अवाज हवा होता जो जास्त दमदारही नसेल आणि नाजूकही नसेल. यशनं चक्क सचिनचे काही सिनेमे इंटरनेटवर पाहिले आणि त्यानंतर पुन्हा ऑडिशन घेतलं असं सचिन मुलाखतीत म्हणाला आहे.
सचिननं मुलाखतीत सिनेमातील काही प्रसिद्ध संवाद बोलूनही दाखवले आहेत. पण नेमके हे संवाद रेकॉर्ड करताना सचिनचा अनुभव कसा होता हे ऐकणं खूप रंजक आहे. सचिन म्हणाला,''सिनेमाताील 'वॉयलैंस वॉयलैंस' हा संवाद रेकॉर्ड करताना तब्बल २० टेक्स घेण्यात आले होते''. असे अनेक सचिननं सांगितलेले अनुभव धमाल आणणारे आहेत,तर डबिंगच्या दुनियेची जादू दाखवणारे आहेत. तेव्हा मुलाखतीत जोडलेली केजीएफ २ चा डबिंग आर्टिस्ट सचिन गोळेची मुलाखत नक्की ऐका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.