मुंबई - काही महिन्यांपूर्वीच साउथचा चित्रपट केजीएफ चॅप्टर २ ने जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटामुळे रॉकी भाई अर्थात अभिनेता यशला जागतिक पातळीवर ओळख मिळाली. या यशाची कल्पना अभिनेता यशला आधीच होती, असं सांगतानाच त्याने दाक्षिणात्य सिनेमांची केल्या जाणाऱ्या चेष्टेवर मोठं विधान केलं. एका कार्यक्रमात तो बोलत होता. (kgf star Yash news in Marathi)
यशला केजीएफ 1 आणि 2 या चित्रपटांतून मिळालेल्या यशामुळे तू खूश आहेस का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यश म्हणाला की, माझं बोलणं ऐकून तुम्ही मला उद्धट समजू नका. हे खूप दिवसांपासून घडावं अशी माझी इच्छा होती. मी माझ्या आयुष्यात दररोज याचं स्वप्न पाहिले आहे. साधारण ५-६ वर्षे मी त्याची वाट पाहत होतो. आता जर कोणी मला विचारलं की तुला काय वाटते. तर मी म्हणतो, माझ्यावर तितका मोठा परिणाम झाला नाही. आता मी पुढचा विचार करतोय. मला ही प्रसिद्धी हवी होती. मिळालेलं यश पाहून मला आश्चर्य वाटल्याचंही यशने म्हटलं.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एकापेक्षा एक सरस सिनेमे देत आहे. यश म्हणाला, मागील 10 वर्षांत साऊथचे डबिंग चित्रपट लोकप्रिय होऊ लागले आहेत. सुरुवातीला लोक दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवत असत. साऊथच्या सिनेमातील ऍक्शन पाहून लोक चेष्टा करू लागले. साऊथच्या सिनेमाची सुरुवातच तशी झाली होती, अशी खंतही यशने बोलून दाखवली. मात्र हळूहळू लोकांना ते आवडत आहे. आता लोकांनी साऊथची कला समजून घेण्यास सुरुवात केल्याचे यशने नमूद केलं.
"अडचण अशी होती की आमचे चित्रपट कमी किंमतीत विकले जात होते. कारण त्याचे डबिंगही खराब होते. चित्रपटातील पात्रांना मजेशीर नाव देऊन कमी लेखले गेले. माझ्याबाबतीत तसचं झालं. सुरुवातीला लोक मला रॅम्बो सर आणि ग्रेट लायन म्हणू लागले. ते का तस म्हणत होते याचा मी विचार करत होतो. मग मला कळलं, माझे जुने सिनेमे त्यापद्धतीने डब झाले होते, असही य़शने नमूद केलं.
दरम्यान राजामौली सरांनी दक्षिणेत जबरदस्त प्रकल्प तयार करण्यास सुरुवात केली. बाहुबलीने लोकांवर प्रभाव पाडला आणि केजीएफ वेगळ्या मानसिकतेने बनविला गेला. आमचा उद्देश लोकांना प्रेरीत करणे होता, त्यांना घाबरवून टाकण्याचा नव्हता. आम्ही अगदी छोट्या बजेटपासून सुरुवात केली. आता लोकांना दाक्षिणात्य चित्रपट समजू लागले आहेत. त्यामुळे सध्याचा काळ चांगला असल्याचंही यशने नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.