Zee Marathi Serials : सध्या झी मराठी वाहिनीवरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग अत्यंत कमी झालाय. याचा फटका चॅनलच्या TRP ला आणि आणि मालिकांना बसत आहे. परिणामी झी मराठीच्या मालिका पूर्ण कथानक न होताच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी लोकमान्य मालिकेन प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची ही मालिका सुद्धा अर्धवट प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अशातच यशोदा मालिकेत गोदावरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री तारका पेडणेकर हिने सोशल मिडीयावर या प्रकरणी पोस्ट केलीय.
(yashoda marathi serial zee marathi goes off air due to low trp)
तारका लिहिते.. ❝अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी❞ आज आमच्या "यशोदा गोष्ट श्यामच्या आई ची" ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रासारित होत आहे. कथानक अर्धवट सोडून मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यायची वेळ आली. ह्याला जबाबदार कोण? तर (TRP). मालिकांच आयुष्य हे TRP वर अवलंबून असतं. पुरेसा प्रेक्षक मिळत नसल्यामुळे नाईलाजाने ही कलाकृती बंद करावी लागतेय ह्याच दुःख तर आहेच पण ह्या प्रवासात ज्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला, ज्यांनी मालिकेवर, आम्हा कलाकारांवर भरभरून प्रेम केलं, वेळोवेळी कौतुकाने आमची पाठ थोपटली त्या सगळ्यांचे मनापासून आभार.
तारका पुढे लिहीते.. "ह्या काळात अशा उत्तम कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या धाडसी निर्मात्याचे मनापासून आभार. मला गोदावरी हे पात्र साकार करायची संधी देण्यासाठी आणि ती उत्तम घडवून आणण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सगळ्यांचे आभार. माझ्या संपूर्ण यशोदा परिवाराचे आणि त्यामधील प्रत्येक लहान मोठ्या सदस्याचे मनापासून आभार. त्यांच्यामुळे हा छोटासा प्रवास खूप सुखद आणि छान झाला.
अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी घेवून पुढच्या प्रवासाला निघतेय. लवकरच पुन्हा भेटु एका नवीन मालिकेत, एक नवीन भूमिकेत. तोपर्यंत तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू दे.Thank you all"
यशोदा या मालिकेचा शेवटचा भाग आज शनिवारी १९ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता प्रसारीत होणार आहे.
एखादी मालिका अशी बंद होणं, याचं कलाकारांना वाईट वाटणं साहजिक आहे. पण आता झी मराठीने प्रेक्षकांना काय पहायला आवडतं, याचा विचार करुन नवी आणि फ्रेश कथानकं आणली तरच झी मराठीला गतवैभव प्राप्त होईल, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.