Yashraj Mukhate : 'अल्पना अन् मी आज विवाहबद्ध झालो'! यशराजचं शुभमंगल

अल्पना आणि यशराज आज (Yashraj Mukhate Wedding) विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Yashraj Mukhate Alpana Married
Yashraj Mukhate Alpana Marriedesakal
Updated on

Yashraj Mukhate Alpana musician Wedding: प्रसिद्ध संगीतकार यशराज मुखाटे हा विवाहबद्ध झाल्याची बातमी समोर आली आहे. काही वेळापूर्वी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. त्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यशराजनं इंस्टावर ती पोस्ट शेयर करत म्हटलं आहे की, मी आणि अल्पना आज विवाहबद्घ होत आहोत. या दोन्ही सेलिब्रेटींनी नोंदणी पद्धतीनं लग्न केल्याचे दिसून आले आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून यशराजच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर तो विवाहबंधनात अडकला आहे.

यशराजच्या बाबत बोलायचे झाल्यास तो कोरोना काळात जास्त प्रकाशझोतात आला होता. त्यानं तयार केलेली काही गाणी, मीम्स चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय होता. बॉलीवूडच्या चित्रपटांतील संवादावर आधारित गाणी आणि आणखी काही व्हिडिओ तयार करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तो कमालीचा लोकप्रिय झाला होता.

यशराजबाबत आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे तो प्रसिद्ध संगीकार अमित त्रिवेदीचा मोठा चाहता आहे. आता यशराज आणि अमितचं गाणही प्रदर्शित झालं असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जसलीन रॉयलनं त्यामध्ये गाणं गायलं आहे. यशराजच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Yashraj Mukhate Alpana Married
Aamir Khan : ख्रिसमसमध्ये आमिर खान करणार मोठा धमाका, त्याच्याच 'या' चित्रपटाचा सिक्वेल करणार प्रदर्शित?

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी मुखातेला त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात मिथिला पालकर, जेमी लिव्हरसह अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. यशराज हा त्याच्या आगळ्या वेगळ्या क्रिएटीव्हिटीसाठी ओळखला गेलेला सेलिब्रेटी असून त्याचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे.

कशामुळे आला चर्चेत?

यशराजची काही गाणी ही खूपच लोकप्रिय झाली होती. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास रसोडे में कौन था, बिकीनी शूट आणि तौडा कुत्ता टॉमी साड्डा कुत्ता कुत्ता नावाच्या गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट होत्या. यानंतर मात्र यशराज देशातील तरुणाईच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.