ये रिश्ता क्या कहलाता है, फेम संजय गांधी 'बेकार'

सध्या जे काम मिळते आहे त्यासाठी खूप कमी मोबदला दिला जात आहे.
sanjay gandhi
sanjay gandhiTeam esakal
Updated on

मुंबई - देशात कोरोनाच्या दुस-या लाटेनं कहर (corona wave) केला आहे. त्या लाटेमध्ये अनेकांचा रोजगार गेला आहे. नोक-या गेल्या आहेत. काहींना दोन वेळच्या जेवणाच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे. यावेळी बॉलीवूडमध्येही कित्येक सेलिब्रेटींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी टेलिव्हिजन क्षेत्रातील (Televison actor) कलाकारांनी त्यांना जाणवणा-या आर्थिक समस्यांविषयी सोशल मीडियावरुन सांगितले होते. आता एका प्रसिध्द हिंदी मालिकेतील अभिनेत्यानं आपली व्यथा मांडली आहे. (ye rishta kya kehlata hai fame actor sanjay gandhi jobless past 10 months)

ये रिश्ता क्या कहलाता है (yeh rishta kya kehlata hai) ही सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. त्या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्या मालिकेतील प्रसिध्द अभिनेता संजय गांधी (sanjay gandhi) यांनी आपल्याला सामो-या जाव्या लागणा-या आर्थिक समस्येविषयी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना त्यांच्या सद्यपरिस्थितीविषयी माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांना सामो-या जाव्या लागणा-या आर्थिक समस्येविषयी सांगितले होते.

एका मुलाखतीमध्ये संजय गांधी यांनी सांगितले आहे की, सध्या इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे अवघड झाले आहे. कोरोनामुळे सगळी परिस्थिती बदलली आहे. मात्र त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमच्या सारखे अनेक कलाकार सध्या घरात बसले आहेत. त्यांच्याजवळ काम नाही. त्यांनी काय करायचे हा मुख्य प्रश्न आहे. कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रावर वाईट दिवस आले आहेत.

sanjay gandhi
'करिअर उद्ध्वस्त करुन त्याला मी रस्त्यावर आणेन'; केआरकेची सलमानला धमकी
sanjay gandhi
'टार्झन' फेम अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू

सध्या जे काम मिळते आहे त्यासाठी खूप कमी मोबदला दिला जात आहे. कोरोनामुळे अनेक सहकारी सोडून गेले आहेत. लोकं अडचणीत आली आहेत. मला त्यांची मदत करायची आहे पण सध्या मीच संकटात सापडलो असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.