Year End 2022: 'या' मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

2022 या सालामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. यात कॉमेडी, सस्पेन्स, लव्हस्टोरी तर काही ज्वलंत विषयावर आधारित सिनेमे होते.
Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Year End 2022: Marathi Movie success journey on box officeEsakal
Updated on

Year End 2022: कोविड, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतर संपूर्ण जगासाठीच 2022 हे साल हे दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झालं. सिनेसृष्टीच्या ही जीवात जीव आला. या वर्षात अनेक रखडलेले सिनेमे आणि नवे सिनेमा रिलीज झाले.

2022 सालामध्ये देखील अनेक मराठी सिनेमा चर्चेत आले. काही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काही सिनेमे प्रेक्षकांची मन जिंकण्यात फेर ठरले. 2022 सालामध्ये कोणत्या मराठी सिनेमांचा बोलबाला राहिला, कोणत्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली याचा आढावा आपण घेणार आहोत.(Year End 2022: Marathi Movie success journey on box office)

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Lalit Prabhakar: 'नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला...', ललित प्रभाकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

2022 या सालामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. यात कॉमेडी, सस्पेन्स, लव्हस्टोरीतर काही ज्वलंत विषयावर आधारित सिनेमे होते. सोबतच ऐतिहासिक विषयांवरील सिनेमे प्रदर्शित झाले. या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांनी पसंती दिली ती म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना आणि म्हणूनच 2022 या वर्षात सर्वाधिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तो म्हणजे पावनखिंड हा सिनेमा.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Marathi Movie: 'अवतार 2' नं केला सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' चा गेम, आपल्याच घरातून मराठी सिनेमा हद्दपार

या सिनेमाने भारतात 40 कोटींची कमाई केली तर संपूर्ण जगभरात जवळपास 43 कोटींचा गल्ला जमवला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात घोडखिंडीतील रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीत आपलं रक्त सांडलं हा इतिहास सर्वांनाच ठाऊक असला तरी या सिनेमात बाजीप्रभूंसोबतच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्राणाची आहुती देणाऱ्या इतर मावळ्यांची कथा आणि त्यांचे धैर्य पाहायला मिळतं. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली याचा प्रवास ऐकायला मिळतो. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Marathi Movie: हातात बंदूक,डोळ्यात सूड भावना..',ओळखूच येईना 'वीर दौडले सात'चा हिरो,विराट मडके चर्चेत...

तर 2022 या सालामध्ये 'पावनखिंड' या सिनेमानंतर प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली ती म्हणजे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. म'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींचं बॉक्सऑफिस कॅलेक्शन गाठलं. तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण जवळपास 24 कोटींचा गल्ला जमवला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा म्हणजे धर्मवीर नेते आनंद दिघे यांचा जीवनपट आहे.  सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Marathi Movie: अखेर मराठीला मिळाला दमदार Action Hero, कोण आहे प्रसाद मंगेश ज्याची रंगलीय चर्चा...

प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या धर्मवीर नेते आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारून त्यांने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या या जीवन प्रवासाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली सिनेमा ब्लॉकस्टर ठरला.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Marathi Serial: संकेत मिळताच नेत्राच्या कानामागून कसा येतो घाम? तितिक्षानं सांगितली मॅजिक ट्रिक

सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित मराठी चित्रपट मनो जिंकण्यात यशस्वी ठरला. सिनेमाने देखील बॉक्स ऑफिस वर तगडी कमाई केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.हंबीरराव मोहिते हे या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Ved Trailer: जेनेलियाचं अस्खलित मराठी अन् कधी कुणाचीही नसावी अशी लव्ह स्टोरी,'वेड'चा ट्रेलर मनाला भिडला..

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कर्तृत्व, त्यांची युद्धनीती, महाराजांप्रती त्यांची असलेली निष्ठा आणि त्यांचा प्रामाणिकपणा या सगळ्या बाबी या चित्रपटात पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता गश्मीर महाजनीने साकारल्या आहेत. तर हंबीरराव मोहिते ही व्यक्तिरेखा प्रवीण तरडे यांनी समरसून साकारली आहे. या सिनेमाने क जवळपास कोटींची कमाई केली होती.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Salman Khan Birthday: 'तर आतापर्यंत आजोबा बनलो असतो..', जेव्हा सलमाननं दिली होती पहिल्या प्रेमाची कबुली..

2022 या वर्षामध्ये एकूणच ऐतिहासिक सिनेमांचा बोलबाला दिसून आला. कारण पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव या सिनेमानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिस वर तगडी कमाई केली. हा सिनेमा वादाच्या वावरात अडकल्याने या सिनेमातले अनेक शो बंद करण्यात आले होते मात्र असं असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मी बॉक्स ऑफिस वर जवळपास नऊ कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिजीत देशपांडे लिखित, दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Salman Khan Birthday: पहिली कमाई ७५ रुपये, आज करोडो छापतोय, वाचा सलमानची दबंग स्टोरी

तर यावर्षी रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास-3' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. टाइमपास सिनेमाच्या या तिसऱ्या सिक्वलमध्ये दगडू आणि प्राजक्ताची जोडी पाहायला मिळाली नसली तरी दगडू आणि पालवीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास साडेसात कोटींची कमाई केली.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Ved Movie Song: दोन वेण्या, सालस लूक, शाळकरी मुलीच्या भूमिकेत जिनिलिया; 'Besuri' गाणं ऐकून पोरं प्रेमात

ऐतिहासिक सिनेमांच्या यादीतील आणखी एक सिनेमा म्हणजेच शेर शिवराज या सिनेमालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. शेर शिवराज या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड या सिनेमानंतर 'शेर शिवराज' या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगाथेतील आणखी एक पान उलगडण्याचा प्रयत्न केला.  चित्रपटात चित्तथरारक असा प्रतापगडचा रणसंग्राम दाखविण्यात आला आहे.  सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास साडेसहा कोटींची कमाई केली.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Podcast:'परिस्थितीपुढे हात टेकले..'; मराठी सिनेमाचं पुष्करनं सांगितलेलं भीषण वास्तव आपल्याला हलवून सोडेल

या सिनेमांपाठोपाठच 'बॉईज 3' आणि 'लोच्या झाला रे' या सिनेमांनादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.

तर मोठी स्टारकास्ट असलेले 'चंद्रमुखी' झोंबिवली आणि 'दे धक्का' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांचा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Year End 2022: Marathi Movie success journey on box office
Mira Rajput ला एअरपोर्टवर चेकिंगसाठी थांबवलं..मग बॅग तपासताना खो-खो हसू लागले सुरक्षारक्षक..वाचा किस्सा

पांघरूण, मी वसंतराव , गोदावरी, एकदा काय झालं, बाल बालभारती हे यावर्षी काही वेगळ्या विषयांवरील सिनेमे देखील प्रदर्शित झाले. तसंच सनी, अनन्या, आपडी थापडी, मिडीयम स्पायसी पाॅण्डेचेरी, लकडाऊन, दगडी चाळ-2 हे देखील 2022 वर्षात प्रदर्शित झालेले काही सिनेमा आहेत. मात्र यमा सिनेमा प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.