'ये रिश्ता..' फेम अभिनेता करण मेहराला अटक; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

पत्नी निशा रावलने तक्रार दाखल केल्यानंतर करणला अटक
karan mehra,nisha rawal
karan mehra,nisha rawal file photo
Updated on

'ये रिश्ता क्या कहलाता है' yeh rishta kya kehlata hai या मालिकेत नैतिक सिंघानिया ही भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहराला karan mehra पोलिसांनी अटक केली आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने nisha rawal त्याच्या विरोधात मारहाणीचा आरोप केला आहे. निशाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर करणला अटक करण्यात आली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलीस करणचा जबाब नोंदवून घेत आहेत. करणला गुरुवारी दंडाधिकारी कोर्टात हजर केले जाईल. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असून कौटुंबिक न्यायालयात दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निशाने पहिल्यांदाच पती करणविरोधात तक्रार दाखल केली आहे. (yeh rishta kya kehlata hai fame actor karan mehra arrested wife nisha rawal complaint)

सोमवारी रात्री झालेल्या भांडणादरम्यान करणने पत्नीला भिंतीच्या दिशेने ढकललं. यानंतर तिच्या डोक्याला दुखापत झाली. करणविरोधात ३३६ आणि ३३७ कलमांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

karan mehra,nisha rawal
'अलका कुबल बनून राहशील तर कोणी ढुंकून पाहणार नाही'; ट्रोलर्सना जुईचं सडेतोड उत्तर

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये निशा आणि करणने लग्न केले. या दोघांना कविश हा चार वर्षांचा मुलगा आहे. निशा सोशल मीडियावर तिच्या मुलासोबतचे आणि करण सोबतचे व्हिडीओ नेहमी शेअर करत होती. तसेच निशा आणि करणच्या जोडीचे अनेक चाहते आहेत.

करणने सात वर्षे 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमध्ये करण आणि हिना खानच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.करणने बिग बॉस सिझन 10 मध्ये देखील भाग घेतला होता. तसेच निशा देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने शादी मुबारक, केसर आणि लक्ष्मी या शोमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()