Yog Yogeshwar Jai Shankar: "माझी तयारी नव्हती पण माझ्या बायकोने..", मालिका संपताना शंकर महाराज साकारणारा संग्राम समेळ भावूक

संग्राम समेळने योगयोगेश्वर जय शंकर मालिका संपल्यावर भावूक पोस्ट शेअर केलीय
yog yogeshwar jai shankar serial off air sangram samel who played shankar maharaj emotional post
yog yogeshwar jai shankar serial off air sangram samel who played shankar maharaj emotional postSAKAL
Updated on

योगयोगेश्वर जय शंकर मालिका ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेच्या माध्यमातून शंकर महाराजांची कहाणी छोट्या पडद्यावर साकार झाली.

अशातच मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. योगयोगेश्वर जय शंकर मालिका आता बंद होणार आहे. या मालिकेत शंकर महाराजांची भुमिका अभिनेता संग्राम समेळने साकारली. संग्रामने मालिका संपल्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली.

(yog yogeshwar jai shankar serial off air sangram samel who played shankar maharaj emotional post)

yog yogeshwar jai shankar serial off air sangram samel who played shankar maharaj emotional post
Bharat Jadhav: भरत जाधव यांचं नवीन नाटक 'अस्तित्व', ही अभिनेत्री पुन्हा रंगभूमी गाजवणार

संग्रामने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलं की, “…आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं. एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. वैयक्तिक माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती ही भूमिका करणं. शारिरीक आणि मानासिक सुद्धा. पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते. पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी डेली सोप घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर ९ महिने खंबीर पणे घर सांभाळलं. माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं."

संग्राम पुढे लिहीतो, "कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून घर सांभाळलं. जेणेकरून मला माझं काम नीट करता यावं. माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. जेणेकरून मला माझ्या कामात १०० टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय.”

संग्राम शेवटी लिहीतो, “आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा एक असा माणूस ज्याच्याशिवाय मी महाराजांची भूमिका कधीच वठवू शकलो नसतो तो म्हणजे बाळकृष्ण तिडके. ज्यांनी माझ्याकडून महाराजांचे हावभाव, लकबी, चालणं, बोलणं सगळं करून घेतलं. बाळू दादा ही भूमिका आपण दोघांनी साकारलीय.”

“कलर्स मराठी या वाहिनीच्या पहिल्या काही मालिकांपैकी एक म्हणजे ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ तेव्हापासून मी कलर्सबरोबर काम करतोय. पण या भूमिकेसाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. विराज राजे सर, किर्तीकुमार नाईक सर, ऋषिकेश सर मनापासून आभार. आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी मला तुमच्या दैवताच्या भूमिकेत स्वीकारलं, प्रेम दिलं, आदर दिला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय शंकर..”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.