The Kerala Story: टिमला खास निमंत्रण! योगी कॅबिनेटसोबत केरळ स्टोरी पाहणार...

The Kerala Story Controversy
The Kerala Story ControversyEsakal
Updated on

The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे सध्या मनोरंजन विश्वासह राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. या चित्रपटासंदर्भात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.

एकीकडे तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारनेही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे अनेक राजकिय नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा देत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

त्यातच मध्य प्रदेशात 'द केरळ स्टोरी' चित्रपट करमुक्त केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

त्यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाची टीम यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे.

या बैठकीत ते चित्रपट करमुक्त केल्याबद्दल सीएम योगी यांचे विषेश आभार मानणार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेवरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

The Kerala Story Controversy
The Kerala Story Reaction : 'आई म्हणून सांगते, 'केरळ स्टोरी'ला विरोध करणारे राजकीय पक्ष हे...' स्मृती इराणींची प्रतिक्रिया!

उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी  'द केरळ स्टोरी' च्या समर्थनार्थ संपूर्ण कॅबिनेटसोबत हा चित्रपट पाहणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी चित्रपट करमुक्त घोषित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

The Kerala Story Controversy
The Kerala Story Controversy: ममता बॅनर्जींना चॅलेंज! द केरळ स्टोरीच्या बंदी विरोधात निर्मात्यांची सुप्रीम कोर्टात धाव..

ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लोकांना हा चित्रपट पाहायचा आहे. आमच्या बंधू-भगिनींना कसा त्रास सहन करावा लागला हे त्यांना समजून घ्यायचे आहे. आम्ही चित्रपट पाहणार आहोत. बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालणे लोकांना आवडले नाही.

The Kerala Story Controversy
Ketaki Chitale: केतकीचं फेसबुक अकाउंट लॉक, इंस्टाग्रामवरूनही अभिनेत्रीचा झाला तिळपापड

आम्ही तुम्हाला सांगतो की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी सोमवारी कोणत्याही प्रकारच्या द्वेष आणि हिंसाचाराने भरलेल्या घटना किंवा त्याचा निषेध टाळण्यासाठी राज्यात 'द केरळ स्टोरी'च्या रिलीजवर बंदी घालण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा चित्रपट त्या राज्यामध्ये प्रदर्शित होत नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.