अमिताभ बच्चन हे वयाच्या ८० व्या वर्षातही छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी अॅक्टिव्ह आहेत. सध्या ते 'केबीसी' चा १३ वा सिझन होस्ट करतायत. तसंच बरोबरीने त्यांचं सिनेमांचं शुटिंगही सुरू आहे. 'ब्रम्हास्त्र' हा त्यांचा मोठा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. आता तसं पहायला गेलं तर अमिताभ यांच्या पिढीतले जवळ-जवळ सर्वच नट कालबाह्य झाले. कितीतरी जण हयात नाहीत आणि जे आहेत ते कधीच इंडस्ट्रीमधनं बाहेर गेलेत. पण मग जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे आपण पाहतो तेव्हा त्यांची वयाच्या ८० व्या वर्षी दिसणारी एनर्जी आपल्याला खूप खुजं बनवून टाकते. या वयात घरी माणूस आराम करतो पण अमिताभ बच्चन नावाचं स्पिरीट वर्षागणिक वाढत्या वयाच्या सगळ्याच सीमा ओलांडत दुप्पट उत्साहाने काम करताना दिसतो. अभिनेता अभिषेक बच्चननं स्वतः अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या ब-याच गोष्टींचे खुलासे केलेत.
अभिषेक बच्चन म्हणाला की, ''माझे वडील कलकत्ता इथे खूप चांगल्या पगाराची खरंतर नोकरी करीत होते. पण ते मुंबईत आले ते एका फिल्म कॉन्टेस्टसाठी. तेव्हा ते मरीन ड्राइव्हच्या रस्त्यांवर कडेला जे बेंचेस आहेत त्यावर झोपायचे. कॉन्टेस्टमध्ये निवड झाली नाही म्हणून त्यांनी 'ऑल इंडिया रेडीओ' मध्येही प्रयत्न केले पण तिथे त्यांचा आवाज रीजेक्ट झाला. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न करीत राहीले,मिळेल ते काम केले. आणि आज जे काही ते आहेत ते त्यांनी केलेल्या कामामुळे,कष्टांमुळे. त्यांनी त्यांच्याकडे असलेलं कामाचं नाणं योग्य वापरलं आणि खणखणीत वाजवून दाखवलं. आज माझ्या वडिलांनी जे कष्ट करून कमावलंय ते मला वाया जाऊन द्यायचं नाही. मला त्यांचा अनादर होईल असं कोणतंच काम करायचं नाही. मला जन्मतःच असं कुटुंब मिळालं जे प्रथितयश आहे,समाजात त्याचं मोठं प्रस्थ आहे त्यामुळे माझ्यावर ती जबाबदारी आपसूक आली की मी त्याला कुठेही तडा जाऊ न देणं. माझे वडील आज कितीही मोठे स्टार असले तरी आजही ते फॅनफॉलोईंग कमी-जास्त होण्यावर विश्वास ठेवतात.
अभिषेक पुढे म्हणाला,''मला आजही आठवतंय की लहानपणी आमच्या बंगल्याबाहेर अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. तेव्हा अमिताभ नावाच्या जादूने फक्त हात उंचावून फॅन्सकडे पाहिलं की 'जलसा'चा संपूर्ण परिसर त्या आवाजाने दणाणून जायचा. मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आलो तेव्हा पप्पा मलाही सोबत घेऊन जायचे लोकांना हात उंचावून दाखवण्यासाठी. रविवारचा तो दिवस खूप भारी असायचा. मी ही हात उंचावायचो पप्पांसोबत पण मग हळूहळू कळालं की ही गर्दी यतेय ती 'बिग बी' ना पहायला,ज्युनियर बच्चनला नाही''.
'कुली' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला होता, ते खूप आजारी पडले होते. तेव्हा ते बरे होऊन घरी आल्यावर त्यांची एक झलक पहायला जमलेला जनसमुदाय पाहून माझ्याभोवती असलेल्या 'बच्चन' नावाच्या वलयाचं मला अचानक दडपण वाटायला लागलं होतं. पुढे एकदा मोठं झाल्यावर मी त्यंाना विचारलं,''हा जमलेला जनसमुदाय पाहून तुमच्या मनात कोणता विचार येतो?'' तेव्हा ते म्हणाले,''मी विचार करतो हे पुढच्या रविवारी येतील की नाही? कारण हे इथे गर्दी करतायत ते फक्त आणि फक्त केवळ माझ्या कामावरच्या प्रेमापोटी. काम थांबलं, कामातला दर्जा निष्प्रभ ठरला की ही गर्दी उदया इथे नसेल". तेव्हा पटकन मला बच्चन नावाच्या त्या वलयाच्या जबाबदारीचं दडपण वाटू लागलं. ते जपायला मी कमी पडलो तर. भले मी आजही स्ट्रगल करीत आहे पण मी असं कोणतंही काम करणार नाही की त्याने बच्चन नावाला माझ्याकडून काही धक्का पोहोचेल''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.