Sankarshan Karhade News: संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मधून संकर्षणने स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली.
महाराष्ट्राचा सुपरस्टार हा शो निलेश साबळेने जिंकला असला तरीही पहिल्या सिझनमध्ये असलेले बरेचसे स्पर्धक आज मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. संकर्षण सुद्धा याच शो मधून पुढे आलेला कलाकार.
(You may also like marathi actor Sankarshan karhade diet plan )
संकर्षण गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. संकर्षण आजवर नेहमीच फिट आणि आनंदी दिसतोय. संकर्षणच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्नता असते. यामागचं रहस्य संकर्षणने सोशल मीडियावर उलगडलं आहे.
संकर्षणने सोशल मीडियावर एका ताटाचा फोटो पोस्ट केलाय. या ताटात वरण भात, काकडी, भरलं टोमॅटो, वांग्याचं भरीत असं साधंसुधं रुचकर जेवण दिसतंय.
संकर्षण हा फोटो शेयर करून लिहितो.. मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर.. माझे बाबा बॅंकेत होते.. आता रिटायर्ड झाले.
ते बरोब्बर ८.४० ला घरातून निघायचे.. कध्धी त्यांची वेळ चूकली नाही.. आणि ८.३० ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चूकली नाही ..
आजही शूट असेल , नसेल .. सकाळी लवकर जायचं असेल नसेल.. मला सकाळी ८.३० झाले कि पोटभर भूक लागते.. आणि मी पोटभर जेवतोच..
संकर्षण पुढे लिहितो.. आज आईने साधं वरण भात.. हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी.. वांग्याचं भरीत .. वाढलं.. अहो काय सांगु कसं वाटलं.. मनसोक्तं हानलं बघा .. माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं. सहज शेअर करावं वाटलं.
अशाप्रकारे संकर्षणने हि पोस्ट शेयर केली. संकर्षणच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी त्याच्या दैनंदिन रुटीनचं कौतुक केलंय.
निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या तिघांचं एकत्रित असं ‘नियम व अटी लागू’ हे नवं नाटक रंगभुमीवर जोरात सुरू आहे.
स्वत: संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.