Gadar 2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू! घटनेचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Gadar 2 Movie Young Man Heart Attack: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील सिनेमागृहात Gadar 2 चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
-young man Collapses & Dies In Lakhimpur Kheri Mall While On Way To Watch Gadar 2 Movie video viral vnp98
-young man Collapses & Dies In Lakhimpur Kheri Mall While On Way To Watch Gadar 2 Movie video viral vnp98Esakal
Updated on

Gadar 2 Movie Young Man Heart Attack: सध्या मनोरंजन विश्वात बॉलिवूड सिनेमांचा बोलबाल पहायला मिळत आहे. त्यात सनी देओलच्या गदरने तर हवाच केली आहे. 2001 मध्ये रिलीज झालेला सनी देओलचा 'गदर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

तब्बल 22 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या 'गदर 2'नेही बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली. 'गदर 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र एकीकडे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे तर दुसरीकडे हा या सिनेमाबाबत उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

गदर-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील थिएटरमध्ये गदर-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

32 वर्षीय अक्षत तिवारी हा तरुण शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गदर-2' चित्रपट पाहण्यासाठी फन सिनेमागृहातगेला होता.

त्यावेळी तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतांनाच सिनेमा हॉलच्या गेटवर त्यााला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

आणि बोलता बोलता अचानक तो जमीनीवर कोसळला. त्याला तेथील लोकांनी तातडीने रुग्णालयात नेले मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही धक्कादायक घटना सिनेमा हॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत तरुण हा कोतवाली परिसरातील द्वारकापुरी परिसरात राहत होता.

सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या अक्षतच्या आकस्मिक मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दु:खचा डोंगर कोसळला. अक्षत तिवारी महेवगंजमध्ये रजत मेडिकल स्टोअर नावाने औषधाचे दुकान चालवत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()