Elvish Yadav Arrested : बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला 14 दिवसांची पोलीस कोठडी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Elvish Yadav Arrested by Noida Police : यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Elvish Yadav Arrested by Noida Police
Elvish Yadav Arrested by Noida Police
Updated on

Elvish Yadav Arrested by Noida Police : यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एल्विशने एका दुसऱ्या यूट्यूबरला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच तो पुन्हा अडचणीत सापडला आहे. आता एल्विश याला वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत खटल्याच्या संदर्भात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्या प्रकरणी यूट्यूबर एल्विश यादव याला रविवारी नोयडा पोलीसांनी अटक केली होती. पोलीसांनी यादव याला चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे आढळून आल्याने पोलीसांनी त्याला अटक केली. यानंतर एल्विश यादव याला आज सूरजपूर कोर्टात हजर देखील करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. एल्विश यादव याच्या अटकेचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये तो पोलीसांसोबत जाताना हसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पोलीसांनी सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणात एल्विश यादव याच्यासह सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पाच जणांना अटक देखील करण्यात आली. राहुल, टीटूनाथ, जय करण, नारायण आणि रविनाथ अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत. या पाच जणांना झालेली अटक भाजप नेत्या मेनका गांधी यांच्या अॅनिमल वेलफेयर संस्था पीएफच्या तक्रारीनंतर करण्यात आली होती. यानंतर राहुल नावाच्या आरोपीने एल्विश यादव याच्याबद्दल मोठे खुलासे केले होते. त्यानंतर पोलीसांनी अनेक वेळा एल्विश यादव याची चौकशी देखील केली.

गुन्हा काय आहे?

नोयडा पोलीसांनी एल्विश यादव विरोधात आयपीसी कलम २८४, २८९, १२०बी, आणि वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट १९७२ चे कलम ९, ३२, ४८, ४९. ५०, ५१ अंतर्गत गु्न्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आरोपींकडून सापडलेले सापांचे विष तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याबद्दलच्या रिपोर्टनंतर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलमे वाढवण्यात आली आहेत. मागील पाच महिन्यांत झालेल्या तपासात पोलीसांना अनेक गोष्टी आढळल्या आहेत.

अडचणी आणखी वाढणार

न्यायालयीन कोठडीत रवाणगी करण्यात आलेल्या एल्विश यादवच्या अडचणी येत्या दिवसांत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याच्या विरोधात ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये मोठ्या शिक्षेची तरतूद आहे.

शिक्षा किती होऊ शकते?

एनडीपीएस कायदा म्हणजेच नारकोटीक्स ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्सटंस कायदा १९८५ हा अमली पदार्थ तयार करणे, विकत घेणे किंवा विकणे आणि शेवन करण्याऱ्याविरोधात वापरला जातो. यामध्ये चरस, गांजा, अफू, हेरॉइन, कोकेन, मॉर्फिन, एलएसडी, एमएमडीए आणि अल्प्राजोलम सारख्या ड्रग्जचा समावेश आहे. अशा प्रकरणात १० ते २० वर्ष शिक्षा आणि १ ते २ लाख दंड होऊ शकतो.

वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट १९७२ अंतर्गत वन्य जीवांना सुरक्षा दिली जाते. यामध्ये ४३ वन्यजीवांचा समावेश आहे. अशा प्रकरणात ३ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

आयपीसीचे कलम २८४ हे विषारी पदार्थ बेजबाबदार पद्धतीने हाताळण्यासंबंधीचे आहे. कारण अशा घटनांमध्ये दुसऱ्या व्यक्तीला धोका संभवतो. अशा प्रकरणात सह महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.