Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 2: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर द केरळा स्टोरीनं थैमान घातलं होतं. निव्वळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या याचित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली. अजूनही या चित्रपटाची कमाई सुरुच आहे.
या चित्रपटामुळं इतर सिनेमे मात्र गडगडले. आता त्यातच सारा अली खान आणि विकी कौशल चा बहूचर्चीत चित्रपट जरा हटके जरा बचके या शुक्रवारी रिलिज झाला. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकेल की नाही याबद्दल शंकाच होती. मात्र आता बॉक्स ऑफिसच्या कलेकश्नवरुन हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशी व्यक्त केली जात आहे.
विकी कौशल आणि सारा अली खान यांची जोडी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षक या जोडीला पसंती देतात की नाही हे पाहणं देखील तितकच महत्वाच होत मात्र, या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसाय केला.
'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.49 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले. त्याचबरोबर चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही आले आहेत. त्यानुसार शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.
SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेड रिपोर्टनुसार, 'जरा हटके जरा बचके' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 7.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 12.74 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी केली सारा आणि विकी कौशल व्यतिरिक्त इनामुलहक, सुष्मिता मुखर्जी, नीरज सूद, राकेश बेदी ते शरीब हाश्मी हे देखील 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात काम करत आहेत.
सुमारे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'जरा हटके जरा बचके' बॉस्क ऑफिसवर अपेक्षित कमाईचा आकडा पुर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.