११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी तयार ना? काय आहे खासियत?

झी मराठी वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे 'महामिनिस्टर' पर्व लवकरच सुरु होणार असून त्यासाठी खास ११ लाखांची पैठणी तयारी करण्यात आली आहे. ही 'महापैठणी' पाहून महिलांचे डोळे दीपतील.
adesh bandekar
adesh bandekar google
Updated on

Entertainment news : राज्यातील गावागावात आणि घराघरात पोहोचलेला 'झी' मराठी (zee marathi) वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने १७ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात जाऊन या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. सध्या या कार्यक्रमाचे १८ वे वर्ष सुरु असून यंदा नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. हे पर्व 'होम मिनिस्टर' ( home minister ) नसून 'महामिनिस्टर' असणार आहे. या पर्वाची नुकतीच घोषणा झाली असून महाविजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

adesh bandekar
अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण

गेली १८ वर्षांचा हा अविरत प्रवास करोनाकाळातही थांबला नाही. करोनाकाळातही ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि महाराष्ट्राचे भावजी म्हणजे आदेश बांदेकर (aadesh bandekar). आपल्या मधाळ आणि मिश्किल वाणीने आदेश बांदेकर यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. १८ वर्षांच्या काळात जवळपास त्यांनी लाखो किलोमीटरचा प्रवास केला आणि जवळपास ५ हजारांहून अधिक गृहिणींचा पैठणी देऊन सन्मान केला. या सगळ्याचा उल्लेख करणारा सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांचा खास प्रोमो व्हायरल होत आहे.

adesh bandekar
या अभिनेत्रीनेही केले लोकलमधील फोटो शेअर..

कसे असेल 'महामिनिस्टर' पर्व ?

हे पर्व ११ एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि महाविजेतील '११ लाखांची' पैठणी देण्यात येणार आहे. पण ही ११ लाखांची पैठणी मिळवणे सोपे नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्व अंदाजे ११ आठवडे चालणार आहे. या पर्वात 'महामिनिस्टर'च्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. अंदाजे १० केंद्रांवर हा खेळ रंगणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रत्येक केंद्रावर सहभागी झालेल्या हजारो महिलांमधून एक विजेती निवडली जाईल. विविध केंद्रावरून विजेत्या ठरलेल्या महिलांचे महाअंतिम पर्व असेल. या महाअंतिम पर्वात चौकसपणा दाखवून सरस ठरणारी गृहिणी महाराष्ट्राच्या महामिनिस्टर पर्वाची महाविजेती ठरेल. या विजेतील ११ लाखांची पैठणी देण्यात येणार आहे. ती कशी असेल याची माहिती...

adesh bandekar
nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..

११ लाखांची पैठणी कशी असेल?

पैठणी हा महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. आपल्या कपाटात एकतरी खरी पैठणी असावी अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. त्यामुळे नेहमीच होम मिनिस्टर मध्ये सहभागी होण्यास महिला उत्सुक असतात. त्यात यंदाच्या पर्वत ११ लाखांची पैठणी मिळणार असल्याचे ऐकूनच अनेकांना धक्का बसला आहे. ११ लाखांची पैठणी नेमकी आहे काय असा प्रश्न सगळ्यानांच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही पैठणी खऱ्या रेशीम धाग्यांपासून बनवली गेली असून ती पूर्णतः हातमागावर तयार करण्यात आली आहे. पैठणीच्या जरीमध्ये खरे सोने वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या पैठणीवर विशेष पद्धतीचे मोर आणि नक्षीकाम केले असून गेली कित्येक महिने ही पैठणी नाशिक नजीकच्या पैठणीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या येवले या गावात विणण्याचे काम सुरु आहे. लवकरच या पैठणीचा पहिला फोटो वाहिनीकडून जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.