नाद बगाडाचा, चर्चा बगाडाची.. अभिनेत्याला बांधलं वाईच्या बगाडाला…

मालिका विश्वात प्रथमच बगाडाचे चित्रीकरण करण्यात आले असून चक्क कलाकाराने परंपरेनुसार ही बगाड यात्रा पूर्ण केली.
man zala bajind
man zala bajind google
Updated on

ENTERTAINMENT News : बगाड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे भूषण. नुकतीच झालेली बावधनची बगाड यात्रा पाहून अनेकांचे डोळे दिपले. तशी बगाड यात्रा याआधीही आपण पहिली आहे. केदार शिंदे (kedar shinde) दिग्दर्शित ''अगं बाई अरेच्चा'' या चित्रपटात एका गाण्यासाठी या बगाड यात्रेचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीत झालेला हा पहिलाच प्रयोग होता. आता मालिका विश्वात हा प्रयोग करण्याचा मान 'झी मराठी' (zee marathi) वाहिनीने मिळवला आहे. 'मन झालं बाजिंद' या मालिकेतून हे बगाड दाखवण्यात आले. या चित्रीकरणाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बगाड यात्रेविषयी लोकांना भलतेच कुतूहल वाटत आहे. लवकरच या भागाचे प्रक्षेपण होणार आहे.

man zala bajind
हेमांगी कवीला हॉट पुरुषांविषयी काय वाटतं?व्हिडिओ झाला व्हायरल..

मालिकेचे इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग झाला असून सातारा - वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर - शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळेल. बावधन सारखेच बगाड फुलेनगर वाई येथे होते. महाराष्ट्राची ही परंपरा या निमित्ताने घराघरात पोहोचणार आहे. नेमका हे बगाड काय आहे, कसं आहे हे प्रेक्षकांना २५ मार्च ते २९ मार्च दरम्यान प्रक्षेपित होणाऱ्या भागातून दिसेल.

man zala bajind
man zala bajind google
man zala bajind
Bollywood: अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!

राया आणि कृष्णा हे या मालिकेतील प्रमुख पात्र असून त्यांच्या नाते संबंधांची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा एकत्र राहिले तर कृष्णाच्या जीवाला धोका असण्याचे भाकीत केलेले असते. त्यामुळे कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा निर्णय रायाने घेतला आहे. त्याच दरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली असल्याने तो ठरवतो की देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचे. पण ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो. या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात पण या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाडाचा मान त्याला मिळतो. याच दरम्यान कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की येत्या ७ दिवसात तिचा मृत्यूयोग आहे त्यावर राया त्यांना सांगतो मी माझ्या कृष्णाचा मृत्यू टाळेन आणि तो 'बगाड्या' म्हणून उभा राहतो. आता खरेच रायाच्या भक्तीने कृष्णाचे प्राण वाचतील का... याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

रायाची भूमिका वैभव चव्हाण (vaibhav chavhan) या अभिनेत्याने साकारली आहे. 'वाई मधील फुलेनगर येथे हा प्रसंग चित्रित केला गेला. हा प्रसंग चित्रित करणं सोपं नव्हतं, पण या गावातील रहिवासींनी आम्हाला खूप सहकार्य केलं. 'बगाड'म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी मेहनत काय असते हे सगळं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला देखील या परंपरेची ओळख झाली आणि आता प्रेक्षकांना सुद्धा बगाड यात्रा पाहायला मिळेल,' अशी प्रतिक्रिया वैभवने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.