मुंबई - सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. ती म्हणजे जगप्रसिध्द फ्रेंडस द रियुनियन (Friends The Reunion ) आता भारतात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आजवर ज्या प्रचंड लोकप्रिय टीव्ही शो होऊन गेले आहेत त्यातील सर्वाधिक पॉप्युलर मालिका म्हणून फ्रेंडसचे नाव घेता येईल. 90 च्या दशकांपासून ही मालिका जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या मालिकेनं भारतातील प्रेक्षकांनाही वेड लावलं. आता या मालिकेतील कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत. आणि तो शो भारतीय प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ( Zee5 Indias largest home grown video streaming Friends The Reunion platform announced )
फ्रेंड्स द रियुनियन हा असा स्पेशल शो आहे की जो वॉर्नर मीडिया कंपनीनं (video streaming ) सुरु केला आहे. तो त्यांच्या आणि एचबीओच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार केला आहे. या कंपन्यांनी एक नवीन प्रोजेक्ट देखील घोषित केला आहे. त्याचं काय आहे एचबीओ हा भारतात उपलब्ध नसल्यानं त्यावर उपलब्ध असणारे अनेक कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांना पाहता येणं शक्य होत नाही. अशावेळी प्रेक्षकांना संबंधित त्या कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी काही मार्ग काढावा अशा उद्देशातून एक नवी कल्पना पुढे आली आहे.
मात्र या कंपन्यांनी ही रियुनियन (Friends The Reunion ) भारतात दाखविण्याची परवानगी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना झी 5 चे ( Zee5 Indias )मुख्य अधिकारी मनीष कालरा म्हणाले, आम्हाला हे सांगण्यास अत्यानंद होतो आहे की, फ्रेंड्स रियुनियनचे प्रसारण आमच्या झी 5 वरुन भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. सध्या सगळ्या जगात या मालिकेविषयी बोलले जात आहे. सगळीकडे त्याचीच तर चर्चा आहे. अशावेळी आपल्या देशात त्या मालिकेचे पुन्हा प्रसारण होते आहे ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल.
भारतीय प्रेक्षकांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. फ्रेंड्स द रियुनियन हा असा एक शो आहे की ज्यात जेनिफर एनिस्टन, कर्टनी कॉक्स, लीजा कुड्रो, मेट लॉब्लाँक, मॅथ्यु पॅरी आणि डेव्हिड श्विमर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.