Anand Dighe: आनंद दिघे यांचा घातपात, शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांचा आरोप

Sanjay Sirsat| हायलाइट झाल्याने विरोधकांच्या पोटात का दुखतंय?’’ असा सवाल करीत त्यांनी चित्रपटातील दृश्यांची पाठराखण केली
Anand Dighe: आनंद दिघे यांचा घातपात, शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांचा आरोप
Updated on

Cha.sambhijinagar: ‘‘आनंद दिघेंना मारलं गेलं, त्यांचा डिस्चार्ज दुपारी होणारा होता. पण, त्यांचा चालता-बोलता मृत्यू झाला? त्याला अटॅक दाखविले. हे कालांतराने लोकांच्या समोर येईल,’’ असे म्हणत ‘‘दिघे यांचा मृत्यू कसा झाला, याची चौकशी व्हावी’’, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केले.

आमदार शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत विविध नेत्यांच्या आरोपांना उत्तरे दिली. ‘धर्मवीर-२’ चित्रपटातील दृश्यांबाबत प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, ‘‘हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, ते जळण्याच्या मार्गावर होते.

Anand Dighe: आनंद दिघे यांचा घातपात, शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांचा आरोप
Anand Dighe Ahram Thane: आनंद आश्रमात पैस उधळले, दोघांची हकालपट्टी; समर्थन करणाऱ्यांना राजन विचारे म्हणाले ‘उंदीर’

त्या सर्वांना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्या कार्यात अग्रस्थानी एकनाथ शिंदे होते. एवढाच त्या दृश्याचा अर्थ असून, ते हायलाइट झाल्याने विरोधकांच्या पोटात का दुखतंय?’’ असा सवाल करीत त्यांनी चित्रपटातील दृश्यांची पाठराखण केली; तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली.

दिघेंची सर यांना येणार का? ः दानवे

‘‘कुठे आनंद दिघे, कुठे संजय शिरसाट? शिरसाट गुजरातमार्गे गुवाहाटी, गोवा व नंतर मुंबईला आले. पुरावे असतील, तर पोलिसांनी ताब्यात घ्यावे. त्यांच्याकडून माहिती घ्यावी आणि दोषींवर कारवाई करावी’’, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

Anand Dighe: आनंद दिघे यांचा घातपात, शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांचा आरोप
Anand Dighe : आनंद दिघें विषयीची काही रंजक माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.