जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईचा प्रस्ताव, शुल्क वसुलीची सक्ती केल्याचा ठपका

2Sakal_20News_11
2Sakal_20News_11
Updated on

औरंगाबाद :  फी वसुली, शैक्षणिक साहित्य यासह अन्य अनियमितताबाबत शहरातील द जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक यांना सादर केला आहे. यावर उपसंचालकांकडून काय निर्णय येतो आता याकडे लक्ष लागले आहे. शहरातील शहानूरमियाँ दर्गा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये काही दिवसांपूर्वी पालकांकडून आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनात शुल्क भरण्यात यावे, शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिकेची लिंक बंद करण्यात आली होती. तर शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत शुल्क वसुलीची सक्ती केली जात नसल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात पालकांकडून आलेल्या तक्रारींसाठी समिती गठित करून शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत शाळेत असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. यावर आता पुढील दंडात्मक कारवाईसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.