औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात 11 मार्चच्या मध्यरात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. तर दर शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे. या अंशतः लाॅकडाऊनच्या काळात सभागृहे, मंगल कार्यालये आणि लाॅन्स या ठिकाणी लग्न समारंभाला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला असून या काळातील विवाह नोंदणी पद्धतीने करावे लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी (ता.सात) दिली. जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यात आज रविवारी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, की सर्व प्रकारचे धार्मिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मोर्चे, धरणे पूर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडे बाजार स्विमिंग पूल बंद राहतील. खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रॅक्टिस करू शकतील. मात्र कोरोनाच्या सर्व नियमावलींचे त्यांना पालन करावे लागणार आहे. शाळा महाविद्यालय विद्यापीठ सुरू राहणार नाहीत. त्यांनी ऑनलाइन शिकवावे. औरंगाबाद शहरातील सभागृह मंगल कार्यालय, लॉन्स येथील लग्न समारंभ पूर्णपणे बंद राहतील. कारण एकाच कुटुंबात जास्त लोक कोरोनाने बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्याऐवजी रजिस्टर मॅरेज करा असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.
खासगी आस्थापना आणि उद्योग दुकान यांनी दर पंधरा दिवसांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेणे बंधनकारक करण्यात आला आहेत आणि अशी प्रमाणपत्र त्यांनी जवळ ठेवली पाहिजे. मार्ट मॉल बंद राहतील, तर चिकन, मटण व अंडी यांचे दुकाने सुरू राहतील. गॅरेज, बँका सुरू राहतील. दर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पूर्णपणे कडकडीत लाॅकडाऊन असेल. हॉटेल बार आणि रेस्टॉरंट हे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तेही एकूण ग्राहक क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने हे सुरू ठेवता येईल. हॉटेल बार रेस्टॉरंटमधून रात्री अकरा वाजेपर्यंत होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. यासाठी अभ्यासिका 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.मंगेश गोंदवले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होत्या.
हे सुरू राहणार
- वैद्यकीय सेवा वर्तमानपत्राची संबंधित सर्व सेवा.
- दूध विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री जीवनावश्यक वस्तूंचे दुकान. पेट्रोल पंप, उद्योग कारखाने बांधकाम हे सुरू राहतील.
महत्त्वाचे
१. सात दिवस बाजार समिती बंद राहील.
२.बुधवारपासून सात दिवसांसाठी बाजार समितीतील भाजीमंडई बंद राहणार आहे.
३.औषधालये, प्रसारमाध्यमांचे नेहमीप्रमाणे सुरु राहिल.
४.ज्या आस्थापना सुरु आहेत. त्यांना दर १५ दिवसाला आरटीपीसी टेस्ट करणे गरजेचे.
५.शहरातील लाॅन, मंगल कार्यालय बंद ठेवणार, लग्नाला परवानगी नाही. रजिस्टर मॅरेज करण्यासाठी व्यवस्था उभारणार.
६. रिक्षा वाहतुकीवर निर्बंध, मास्क आणि प्रवाशी संख्या नियमानुसार असणे बंधनकारक.
७.अंशतःमध्ये रात्री नऊपासून सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. जाधववाडी येथील भाजी मंडई सात दिवस पूर्णपणे बंद असेल.
संपादन - गणेश पिटेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.