थांब्यावरच कळेल, ती सध्या कुठे आहे...

amc aurangabad
amc aurangabad
Updated on

औरंगाबाद- स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी शहर बससेवा सुरू करण्यात आली असली तरी बसथांब्याची बकालअवस्था अद्याप संपलेली नाही. सुरवातीला एमएमसआय (मास्टर सिटी इंटिग्रेट) अंतर्गत डिजिटल बसथांबे केली जातील, असे सांगण्यात आले; मात्र सर्व थांबे एका खासगी कंपनीला देण्यात आले. आता कंपनीने विकसित केलेल्या थांब्यावर महिनाभरात डिस्प्ले लावले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस कधी येणार याची माहिती मिळणार आहे. 

संबंधित बातम्या -

स्मार्ट सिटी योजनेच्या ऍडव्हायसरी कमिटीची बैठक मंगळवारी (ता. 14) घेण्यात आली. यावेळी सुरवातीलाच शहर बससेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या बसमधून रोज 20 हजार प्रवासी प्रवास करत असून, रोज 40 हजारपर्यंत प्रवासी संख्या नेण्याचे उद्दीष्ट आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर बसमध्ये सध्या किती तोटा होतो? याचा अहवाल सादर करण्याची सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी केली. प्रवाशांना बसचे वेळापत्रक माहीत नसते. त्याबद्दल काय करणार? अशी विचारणा करण्यात आली असता, ऍप तयार केले जात असल्याचे सांगण्यात आले; मात्र ऍप किती जण वापरतील? असा प्रश्‍न करण्यात आला. त्यावर बस सध्या कुठे आहे? याची माहिती मिळविण्यासाठी डिस्प्ले एक महिन्यात लावले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

सतत गैरहजर सदस्यांवर गंडांतर 
स्मार्ट सिटी ऍडव्हाझरी कमिटीची दर तीन महिन्याला बैठक होणे अपेक्षित आहे; मात्र मंगळवारी पहिल्यांदाच बैठक झाली. यापुढे प्रत्येक तीन महिन्याला बैठका घेण्याचा निर्णय आज झाला; मात्र जे सदस्य सलग तीन बैठकांना गैरहजर राहतील त्यांना कमिटीतून वगळून नव्या सदस्यांना घेतले जाईल, असे बैठकीनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. 
 
एमएसआयमध्ये सॉफ्टवेअरचा विसर 
"एमएसआय'ची 178 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार शहरात 700 ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत; मात्र या निविदेत सॉफ्टवेअरचा विसर पडला होता. आता सॉफ्टवेअरसाठी वेगळी 25 कोटी तरतूद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 
 
या विषयांवर झाली चर्चा 

  • शहर बससाठी एसटी महामंडळाच्या जागा संपादित कराव्यात. त्यात रेल्वेस्टेशन, शहागंज, सिडको, मुकुंदवाडी या ठिकाणच्या जागांचा समावेश आहे. 
  • बस थांब्यावर जाहिरातीचे फलक लावताना संबंधित ठेकेदाराकडून विमा काढला जावा. एखादी दुर्घटना घडल्यास संबंधिताला आर्थिक मदत मिळू शकेल. 
  • शहरातील पर्यटनस्थळांची पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी नेकसेलची संकल्पना राबवावी. सर्व पर्यटन स्थळे एकमेकांना जोडण्यात यावीत. 
  • पानचक्कीजवळ पर्यटकांच्या पार्किंगसाठी खामनदीवर ओव्हरब्रीज उभाण्याची परवानगी पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.