औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील हे उद्या लॉकडाउन विरोधात मोर्चा काढत आहेत. या मोर्चाच्या अनुषंगाने आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. 'बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत त्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त जागांच्या भरती प्रक्रिया सुरू आहेत व त्यांच्या सर्व प्रश्नांविषयी आम्ही सकारात्मक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिली.
खासदार इम्तियाज जलील यांच्या उद्याच्या मोर्चावर कारवाई करणार का, या विषयावर पत्रकारांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. मला पदभार घेऊन केवळ सहा महिने झाले आहेत. घाटीतील रिक्त पदे ही 2017 पासून आहेत. सुपर स्पेशलिटीची जागांची जाहिरात निघाली असून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. इतरही गोष्टीविषयी आम्ही सकारात्मक आहोत. या विषयावर मी खा. जलील यांच्याशी चर्चा केली असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
सध्या भूमिका आणि कायदा यांची सांगड घालत काम सुरू आहे. नवीन कायद्यानुसार आम्ही काम करणार असल्याचे स्पष्टीकरण देत उद्याच्या मोर्चावर कारवाई होण्याचे संकेतही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून दिसून आले.
हे लॉकडाउन यशस्वी होईल. अनेक लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते मात्र आम्ही त्या तक्रारीचे समाधान केले आहे. खासदार इम्तियाज जलील प्रशासनाला सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे, असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.