कारागीराला डांबून जबर मारहाण, मधुर मिलन मिठाईच्या मालक पिता-पुत्रासह सहा जणांवर गुन्हा

1crime_33
1crime_33
Updated on

औरंगाबाद : पगाराच्या कारणावरुन आणि काम सोडल्यावरुन मधूर मिलन मिठाईच्या मालक पिता-पुत्राने कारागीराला जबर मारहाण करत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वेदांतनगर, रेल्वेस्थानक रस्त्यावरील मधुर मिलन मिठाई भांडारच्या पितापुत्रासह सहाजणांविरोधात वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास नाशिक ग्रामीण नांदगाव येथे वर्ग करण्यात आला. संशयितांनी कारागीर मगराज मांगीलाल नाई (३८, रा. ह. मु. सुखसागर मिठाई सेंटर, दानाबाजार, नांदगाव, नाशिक, मूळ चावंडा, जोधपूर) याला मारहाण करत तीन दिवस डांबून ठेवले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मगराज हा कचोरी व समोसा तयार करणारा कारागीर आहे. त्याने मधुन मिलन मिठाई भांडारावरील काम सोडले होते. पगाराचे पैसे मागितल्याच्या तसेच काम सोडल्याच्या कारणावरून दुंगलसिंग, पदमसिंग, राजूसिंग, राजकमल आणि इतर दोन जणांनी मिळून मगराजला नांदगाव नाशिकवरुन १९ नोव्हेंबर रोजी दुपारी रेल्वे स्थानक रस्त्यावरील भांडारावर आणले. या ठिकाणी मारहाण करीत मिठाईच्या गोदामात डांबून ठेवले. कारागीर मगराज याला मालक दुगलसिंग, पदमसिंग व राजू सिंग यांनी दरमहा २४ हजार रुपये पगार ठरविला होता. तर मगराज यांच्यासोबत त्यांचा मुलगा किशोर नाई (२२) हा सुध्दा काम करीत होता.

त्याला दरमहा १३ हजार रुपये पगार ठरविला होता. दरम्यान, नाई पिता-पुत्राला मागील तीन वर्षापासून देण्यात आला नाही. त्यामुळे मगराज हे गेल्या पाच महिन्यापासून काम सोडून नांदगाव, नाशिक येथे तर त्यांचा मुलगा किशोर नाई हा मागील दोन महिन्यापासून रौतक, हरियाणा येथे कामाला गेला आहे. दरम्यान, १९ नोव्हेंबररोजी मगराज नाई हे सुख सागर मिठाई सेंटर, नांदगाव, जि.नाशिक येथील दुकानात काम करत असतांना दुपारी औरंगाबाद येथील मधुर मिलन मिठाई भांडारचे मालक दुंगलसिंग व त्यांचा मुलगा राजकमल व इतर दोन अनोळखी तिथे आले. त्यानंतर मारत मारत कारमध्ये बळजबरीने बसविले. तेथुन गंगापूर येथील फॅक्टरी समोर नेऊन पुन्हा मगराज यांना मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारे दोन अनोळखी गंगापूर येथेच थांबले आणि दुंगलसिंग व त्यांचा मुलगा राजकमल यांनी मगराज यांना औरंगाबाद येथे एमआयडीसी रेल्वे स्थानक रस्त्यावरील त्यांच्या मिठाईच्या गोदामात रात्री आणले.


तीन दिवस डांबले खोलीत
या सर्वांनी मगराजला गोडाऊनच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत डांबून ठेवले. खोलीला बाहेरून कुलूप लावून सर्वजण निघून गेले. तीन दिवसानंतर राजुसिंग तिथे आला व त्याने मगराज यांना तु आमचे येथे काम कर नाहीतर तुला कापून फेकून देऊ अशी धमकी देऊन निघून गेला.

नजर चुकविली अन् पोलिस ठाणे गाठले
राजुसिंग हा धमकी देऊन निघून गेल्यावरही मगराज यांच्यावर नजर ठेवली जात होती. दरम्यान, मगराज नाई यांनी मंगळवारी सर्वांची नजर चुकवून थेट वेदांत नगर पोलिस ठाणे गाठले. त्यांनतर त्यानंतर दुंगलसिंग, पदमसिंग, राजुसिंग, राजकमल यांच्यासह इतर दोन अनोळखी विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून नांदगाव, नाशिक (ग्रामीण) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Edited - Ganesh Pitekar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()