प्रवाशांनी रेल्वे रोखली जंगलात 

file photo
file photo
Updated on

औरंगाबाद  : दक्षिण मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. नागपूर मुंबई या नंदीग्राम एक्‍सप्रेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी गर्दी कमी करा, नविन डबे जोडा अशी मागणी करत साखळी ओढून जंगलात रेल्वे थांबवल्याने खळबळ उडाली. 

रेल्वेत जागाच नसते 

दक्षिण मध्य रेल्वे मराठवाड्याच्या प्रवाशांवर सातत्याने अन्याय करत आहे. अन्यायी भूमिकेमुळे येथील प्रवाशी दक्षिण मध्य रेल्वेला वैतागला आहे. म्हणून मराठवाडा विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. पुर्वी नांदेड मुंबई अशी असलेली नंदीग्राम एक्‍सप्रेस ही रेल्वे नागपुरपर्यंत करण्यात आली. तेंव्हापासून विदर्भातील प्रवाशी वाढल्याने या रेल्वेचा मराठवाड्याच्या प्रवाशांना उपयोग होत नाही. नागपूर पासून तुडूंब भरुन आलेल्या रेल्वेत मराठवाड्यातील प्रवाशांना जागा मिळत नाही. 

प्रवाशांची हाणामारी 

मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्‍सप्रेसमध्ये औरंगाबाद पासून तर पाय ठेवायलाही जागा नसते. प्रवाशी अक्षरक्षा मेंढरे कोंबावेत अशा पद्धतीने बसलेले असतात. त्यामुळेच या रेल्वेत प्रवाशांचे वादविवाद, हाणामारीचे प्रसंग नेहमीच घडत असतात. या विरोधात रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करुनही दुर्लक्ष केल्या जात आहे. 

अडरानात रोखली रेल्वे 

सोमवारी (ता. तीस) नागपूर मुंबई (क्र. 11402) या रेल्वेमध्ये तुडूंब गर्दी झाली होती. जनरल डब्यात जागा नसल्याने सामान्य प्रवाशी रिझर्वेशनच्या डब्यात घुसले. परिणामी रिझर्व्हेशन असणाऱ्यांही जागा नव्हती. त्यामुळेच जागा न मिळालेल्या प्रवाशांनी मनस्ताप व्यक्त केला. डब्यात तुडूंब गर्दी आणि टीसीचा पत्ताच नाही, अशा परिस्थितीत त्रस्त झालेल्या प्रवाशांनी दौलताबाद पोटूळ (किलोमिटर 93-5/8) दरम्यान साखळी ओढली. साखळी ओढल्याने रेल्वे रात्री अकरा वाजेच्या सुमारास जंगलामध्ये थांबली. 

प्रवाशी सेनेची धावाधाव 

धावती रेल्वे जंगलता अचानक थांबली म्हणून शोध घेतल्यानंतर प्रवाशांना बसण्यास जागा नव्हती, एस-3 कोचमध्ये जागा नसलेल्या प्रवाशांनी जागा करुन द्या अशी मागणी करत साखळी ओढल्याचे लक्षात आले. ही बाब लक्षात येताच रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने एस-3 कोच गाठून प्रवाशांची समजूत घातली. त्यानंतर रेल्वे पुढच्या प्रवासाला निघाली. 

दमरेवर रोष 

दक्षिण मध्य रेल्वे मराठवाड्याच्या प्रवाशांसाठी नविन रेल्वे सुरु करत नाही, आहे त्या गाड्यांना नविन डबे जोडत नाही. उलट असलेल्या रेल्वे गाड्या नागपूर, सिकंदराबाद पर्यंत ओढून नेण्याचे काम प्रशासनाने केले, त्यामुळेच मराठवाड्यातील प्रवाशांचा दक्षिण मध्य रेल्वेच्या विरोधात रोष आहे. आगामी काळात मोठे जनआंदोलन उभारले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.