परभणी जिल्ह्यात : जिंतूर येथील थरारक घटना, तरुण गंभीर जखमी

शॉक लागुन तरुण झाला गभीर जखमी
two wheeler driver electric shock
two wheeler driver electric shock Sakal
Updated on

विद्युत प्रवाह असलेली तार तुटून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडली. यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरातील पठाण मोहल्ल्यात घडली. शेखर चव्हाण असे जखमीचे नाव आहे.

महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून शहरातील विद्युत तारा लोंबकळत आहेत. या धोकादायक परिस्थितीची नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाणीव करून दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्युत तारा तुटून खाली पडण्याचे प्रकार घडत आहे. त्यातच रविवारी शेखर हा दुचाकीने पठाण मोहल्ला परिसरातून जात असताना अचानक त्याच्या अंगावर विद्युत प्रवाह असलेली तार पडली.

त्याला शॉक बसून तो दुचाकीवरून जमिनीवर पडला. त्याच्या हातात विद्युत तार अडकल्याने त्याला काही क्षण विजेचे तीव्र झटके बसले. हा प्रकार परिसरातील सय्यद अबुजर यांनी बघितल्यानंतर त्याने लाकडाच्या साह्याने तारांपासून शेखरला बाजूला काढले. पण, या घटनेत शेखर गंभीर जखमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी त्यास दुचाकीवर रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक त्यास परभणी येथे हलविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.