नांदेड : ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाउनच्या कालावधीत घरात बसून उपासमारीशी संघर्ष करणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, पालातील कुटुंब आदी गरीब, गरजूंना बुधवार (ता. २२) पासून ‘विश्वभोजना’चा आधार मिळाला आहे.
‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाउन करण्यात आले आहे. ढीगभर समस्यांना पायाशी बांधून प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणाऱ्या गरीब, गरजूंना उपासमारीशी संघर्ष करावा लागत आहे.
उपक्रमाला यांचा हातभार
आपत्ती काळात रोजगाराअभावी हातावर पोट असलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, पालातील कुटुंब, हुतात्मा जवानांचे कुटुंब, विधवा-परितक्त्या आदी गरीब, गरजूंची भूक भागविण्यासाठी ग्रीन फिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस आणि कृष्णा ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या पुढाकाराने ‘विश्वभोजन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पाचशेवर मजूर, कामगरांना भोजन
जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. आऊलवार यांच्या समविचारी ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब, गरजूंसह पाचशेवर लाॅकडाउनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगरांना बुधवारी ‘विश्वभोजना’चा लाभ देण्यात आला. दरम्यान, लाॅकडाउन कालावधीत भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी जिल्हाभरात दररोज ‘विश्वभोजन’ उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये १५० ग्रॅम भात, शंभर ग्राम मिक्सव्हेज, १५० ग्रॅम वरण, दोन पोळ्या अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे.
जिल्ह्यातील दोन हजार गरजूंना भाजीपाल्याचे किट
प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘ना नफा, ना तोटा’ या तत्कालिक अनुसरून सोनखेड येथील देशमुख रेस्टाॅरंटचे मालक सुहास मोरे यांचे भोजन बनविण्यात योगदान लाभत आहे. मेडिकल फिट स्वयंसेवकांमार्फत गरजूंना ‘विश्वभोजन’ वाटप करण्यात येत आहे. ‘भुकेली व्यक्ती’ हा उद्देश समोर ठेवून ‘विश्वभोजन’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबणाऱ्या कृष्णा ॲग्रो सर्व्हिसेस, ग्रीन फिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या युनिटतर्फे लाॅकडाउनच्या प्रारंभापासून शेतकरी जगला पाहिजे, या धारणेतून जिल्ह्यातील दोन हजार गरजूंना प्रति दिन भाजीपाल्याचे किट वाटप करण्यात येत आहेत. विषेश म्हणजे आपत्तीमुळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आॅनलाइन दाम देणाऱ्या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.