तुरोरी (उस्मानाबाद) : स्वाईन फ्लुमुळे तुरोरी (ता. उमरगा) येथील एका 49 वर्षीय महिलेचा गुरुवारी (ता. 4) पहाटे सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तापाच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलेवर सुरवातीला 27 सप्टेंबरला तुरोरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना उमरगा येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. उमरगा त्याच दिवशी एका खासगी रुग्णालयात रक्ताची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यादिवशी सोलापूरला हलविण्याचा सल्ला तेथीलही डॉक्टरांनी दिला. त्यामुळे या महिलेवर 27 सप्टेंबरपासून सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला स्वाईन फ्लु झाल्याचे निदान 29 सप्टेंबर रोजी झाले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास या महिलेचे निधन झाले. गुरुवारी सकाळी या महिलेवर तुरोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून गावातील ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.