दर्शनाला जाणारी 'क्रूझर' उलटून दहा भाविक गंभीर जखमी; धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

कोठेवाडी (जालना) येथून भाविकांना भवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे क्रुझर जीपने (एम.एच.२९.एडी. ४९५२) जात होते. सदर वाहन पाचोड च्या बायपास (बाह्यवळणा) वरून जात असतांना जीपचालकाचे वाहनावरी ल नियंत्रण सुटले व क्रुझर जीप रस्त्याच्या मध्यभागी चार कोलांट्या उड्या घेत रस्त्यावर उलटली.
10 devotee injured in accident dhule solapur national highway
10 devotee injured in accident dhule solapur national highwaySakal
Updated on

पाचोड : कोठेवाडी (जालना)हुन तुळजापूर येथे तुळजामाते च्या दर्शनासाठी भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भाविकांची क्रुझरगाडी उलटून झालेल्या अपघातात दहा भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता.पैठण) येथील बायपासवर मंगळवारी (ता.१६) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, कोठेवाडी (जालना) येथून भाविकांना भवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे क्रुझर जीपने (एम.एच.२९.एडी. ४९५२) जात होते. सदर वाहन पाचोड च्या बायपास (बाह्यवळणा) वरून जात असतांना जीपचालकाचे वाहनावरी ल नियंत्रण सुटले व क्रुझर जीप रस्त्याच्या मध्यभागी चार कोलांट्या उड्या घेत रस्त्यावर उलटली.

यांत मैनाबाई प्रतापसिंग शिरे (वय ७५), मिनाबाई संजीव शिरे (वय ३०), मेनकाबाई राजू शिरे (वय ३५), काजल संजय शिरे (वय १५), अनुसयाबाई स्वरूपचंद सरवदे (वय ५०), छाया गंधीसिंहा सिंघल (वय ५०), मनीषा सरदार शिरे (वय ४०),ज्योती सीते (वय ४०), देवकाबाई रूपचंद सरान्डे (वय ४०), राजू प्रतापसिंह शिरे (वय ३७ वर्ष) हे सर्व रा. कोठेवाडी (ता.बदनापूर जि.जालना) हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच पाचोड (भोकरवाडी) येथील टोलनाक्यावर असलेल्या रुग्णवाहिकेला बोलविण्यात आले. तोच रुग्णवाहिका कर्मचारी गणेश चेडे ,विजय धारकर, विठ्ठल गायकवाड आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी उपस्थित डॉ.शेख नोमान यांनी जखमींवर प्रथमोप चार करून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.

हा अपघात होऊन ही जीप रस्त्याच्या मध्यभागी आडवी झाल्याने छत्रपती संभाजीनगरहुन बीडच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः खोळंबून वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताची पाचोड पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अण्णासाहेब गव्हाणे, फिरोज बर्डे हे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()