नायगाव : शाळेच्या पहील्याच दिवशी गणवेश देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती पण १५ आँगस्ट जवळ आला तरी अद्याप गणवेशाचा घोळ संपला नाही. परिणामी नायगाव तालुक्यातील १० हजार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत दरवर्षी घोळ घातल्या जातो कारण शासन कधी कपडा देतो म्हणते तर कधी शाळा स्तरावरच गणवेश खरेदी करण्याचे आदेश देत असते.
पण शाळा स्तरावर खरेदी करण्यात येत असलेल्या गणवेशाची गुणवत्ता दर्जेदार नसल्याच्या कारणामुळे यंदा मात्र शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील गणवेशाचा एकच रंग असावा यासाठी राज्यस्तरावर कापड खरेदी करण्याचा निर्णय घेतला व ग्रामीण भागात महिला बचत गटाकडून शिवून घेण्याच्या सुचना दिल्या. प्रत्येक गणवेशासाठी ११० रुपये दर ठरवण्यात आला आहे.
वास्तविक यापूर्वी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या पहील्याच दिवशी गणवेश वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु शाळा सुरु दोन महिणे होत आले तरी शासनाने अद्याप गणवेशाचा रंग व कापड खरेदीतच घोळ घातला आहे.
सन २०२३-२४ च्या युडायस प्रमाणे नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०७ शाळामधील वर्ग १ ते ८ पर्यंतची विद्यार्थी संख्या १० हजार ९४३ आहे. मात्र एवढे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे यंदा सर्व विद्यार्थ्यांना एक बुट जोडी आणि दोन जोड स्वाँक्स मोफत देण्यात येणार आहेत.
एकीकडे शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी टिकवणे अवघड झालेले असतांना शासन जिल्हा परिषदेच्या शाळेत सोईसुविधा व विद्यार्थ्यांना गणवेश व बुट देण्यासाठी दरवर्षी घोळ घालत असते.
यंदाही तोच प्रकार दिसून येत आहे शालेय शिक्षण विभागाने पहील्याच दिवशी गणवेश देण्याची घोषणा केली पण १५ आँगस्ट स्वातंत्र्य दिन जवळ आला तरी ना कापड आले ना बचत गटांना काम मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय स्वतंत्र दिन जुण्याच गणवेशात साजरा करावा लागण्याची शक्यता आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यार्थ्यांना बुट मोफत देण्यात येणार असून बुट खरेदी करण्यासाठी नायगाव तालुक्याला १८ लाख ६० हजार ३१० रुपये निधी उपलब्ध झाला आहे. प्रती विद्यार्थी १७० रुपये या प्रमाणे प्राप्त निधी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वर्ग करण्यात आला असून शालेय शिक्षण समितीचा ठराव घेवून खर्च करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बुट व.स्वाँक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र गणवेशाचा विषय संपूर्ण महाराष्ट्राचाच असल्याने आणि गणवेश लवकरात लवकर देण्याबाबत शिक्षण विभागही सकारात्मक असल्याने गणवेश पुरवठ्याची कारवाई लवकरच होणार असून त्यासाठी नायगाव पंचायत समितीच्या स्तरावरुन आमचा पाठपुरावा सुरुच आहे.
यंदा बुट व स्वाँक्सबरोबरच राज्यपातळीवर एकाच रंगाचा गणवेश पुरवण्यात येणार होते. पण आजपर्यंत गणवेश मिळाले नाहीत. विषेश म्हणजे आम्ही दररोज गणवेशात येण्याबद्दल विद्यार्थ्यांना सुचना करत आहोत मात्र जुने गणवेश फाटले आहेत, वय वाढल्यामुळे घालता येत नाहीत. दुसरीकडे पालक दररोज शाळेत येवून गणवेश व बुट आणि स्वाक्स कधी येणार अशी विचारणा करत आहेत. त्यामुळे शासनाने गणवेश १५ आँगस्टच्या अगोदर पुरवठा करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.