परभणी जिल्ह्यात ११४ जण ‘होम कॉरन्टाईन’

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणुचा संसर्ग झालेला अद्याप एकही रुग्ण आढळेला नाही. परंतू, संशयीताचा आकडा दिवसेदिवस वाढत चालला आहे. सोमवारी (ता.३०) पर्यंत ११४ जणांना ‘होम कॉरन्टाईन’ करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. 
या सीमेवरून कुणालाही आत सोडले जात नाही किंवा बाहेर जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच परभणी शहरात व तालुकास्तरावरील गावांना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव अद्यापही जिल्ह्यात झालेला नाही. ‘कोरोना’ विषाणु संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने सोमवारी (ता.३०) सायंकाळी काढण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात अद्याप एकही ‘कोरोना’ची लागन झालेला रुग्ण सापडलेला नाही. परंतू, जिल्ह्यात संशयीत रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत जात आहे. 


सोमवारपर्यंत १५४ संशयीत रुग्णांची नोंद
यात सोमवारपर्यंत १५४ संशयीत रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. आजपर्यंत १०३ स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ७६ निगेटीव्ह असून १२ स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहेत. आजतागायत एकूण १५ स्वॅब राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथील प्रयोग शाळेने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

अशी आहे कोरोना संदर्भातील आकडेवारी

एकूण नोंद झालेले रुग्ण : १५४
होम कॉरन्टाईन रुग्ण :११४
हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्ष : १७
कॉरन्टाईनचा कालावधी पूर्ण झालेले : २३
परदेशातून आलेले नागरीक : ५९
परदेशातून आलेल्याच्या संपर्कातील नागरिक : ०५

हेही वाचा ....


पूर्णेत वादळीवाऱ्यासह पाऊस
पूर्णा(जि.परभणी) :
विजेच्या कडकडटासह वादळी वाऱ्याने पूर्णा येथे सोमवारी (ता.३०) रात्री साडेसात वाजता पावसाला सुरवात झाली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या गहू, ज्वारी काढण्यात येत आहे. तसेच हळद शिजवून टाकलेली असून फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.