धाराशिव : धाराशिव जिल्हयाची अंतिम मतदारयादी सर्व मतदान केंद्रस्तरावर, तहसिल स्तरावर व उपविभाग स्तरावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतीम मतदार याद्या मंगळवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांनी स्वतःचे नाव यादीत समाविष्ठ असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध
जिल्ह्याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १३ लाख ६६ हजार ७२२ मतदार आहेत. तर पुरुष ७ लाख २३ हजार ८२५ असून स्त्री मतदार ६ लाख ४२ हजार ८५६ तर इतर मतदार ३८ आहेत.
१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनाकांवर आधारीत छायाचित्रासह मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत नवमतदार नोंदणीमध्ये नमुना ६ चे एकूण ८७ हजार ०८१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार ४३ हजार ८६७, पुरुष मतदार ४३ हजार २०१ व इतर १३ मतदार आहेत. मयत, दुवार, स्थलांतरीतचे एकूण ६२ हजार ९४७ नमुना ७ चे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार २९ हजार ७८० पुरुष मतदार ३३ हजार १६४ व इतर ३ मतदार आहेत. तसेच नाव व पत्ता दुरुस्तीचे नमुना ८ चे एकूण २७ हजार १०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार १० हजार २३० पुरुष मतदार १६ हजार ८६३ व इतर ११ मतदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.