Crime
CrimeSakal

Beed Crime : अवैध वाळू उपसा करणा-या तीन केन्या व ट्रॅक्टरसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराईतील गोदावरी पात्र हे अवैध वाळू उपसाचे कुरण होऊन बसले आहे.
Published on

जातेगाव (जि. बीड) - बीडच्या गेवराईतील गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा होत असल्याची माहीती स्थानिक गून्हा शाखेला मिळताच आज दुपारी चार वाजता छापा टाकून तीन केन्या, ट्रॅक्टरसह साधारण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाळूची चोरी करणा-या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गेवराईतील गोदावरी पात्र हे अवैध वाळू उपसाचे कुरण होऊन बसले आहे. मात्र, गेवराईचे पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला याची खबरबात न लागता. बीडचे स्थानिक गुन्हा शाखेकडून आज दुपारी चार वाजता हिंगणगाव परिसरात छापा टाकून अवैध उपसा करणा-या तीन केन्या व ट्रॅक्टरसह साधारण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून, सदरील कारवाई गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, फौजदार ए. एस. मुरकुटे, पोलीस हवालदार ठोबंरे अदीने केली आहे. याच महिन्यात बीडच्या गुन्हा शाखेकडून गेवराईतील वाळूच्या संदर्भातील तीसरी कारवाई आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.