Teerth Darshan Yojana : तीर्थदर्शन योजनेसाठी आले दोन हजार अर्ज; अयोध्या, बुद्धगया, केदारनाथला जाणारे सर्वाधिक

ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांवर जाता यावे यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अमलात आणली आहे.
2000 applications for Teerth Darshan Yojana Most people go to Ayodhya Buddha Gaya Kedarnath
2000 applications for Teerth Darshan Yojana Most people go to Ayodhya Buddha Gaya Kedarnathsakal
Updated on

जालना : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांवर जाता यावे यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अमलात आणली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातून २ हजार ३७८ अर्ज समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

शासनाकडून विविध योजनांचा प्रचार व प्रसार केला जात आहे. त्यातच सरकारने सर्व धर्मीयांसाठी, ज्येष्ठ व्यक्तींना देशातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे.

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेत प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवास आदी बाबींच्या प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार रुपये शासनाने मंजूर केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्याभरातून २ हजार ३७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये छाननीअंती ८५३ अर्ज पात्र ठरले आहेत. १ हजार ४९४ अर्जांची छाननी सुरू असून ३१ अर्ज अपात्र ठरले आहेत.

अयोध्या, बुद्धगया आणि केदारनाथ तीर्थस्थळांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ऑफलाइन अर्ज, ३१ ऑक्टोबरपर्यंत समाजकल्याण कार्यालय जालना येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थींचे आधार कार्ड/ रेशन कार्ड आदी.

ज्येष्ठ व्यक्तींना देशातील विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. दिलेल्या नमुन्यात ऑफलाइन अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज समाजकल्याण विभागात जमा करावा.

- अतिष ससाणे, कार्यालयीन अधीक्षक, समाजकल्याण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.