हिंगोली : हिंगोली नगर पालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कराचा भरणा न करणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांच्या नावाची यादी विविध चौकात लावणे, यादी प्रसिद्ध करणे आदी कारवाया करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याशिवाय वेळेत कर न भरणाऱ्यांना नगर पालिका २४ टक्के दंड व्याज आकारणार आहे.
नगर परिषदेने थकबाकीदार नागरिकांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. थकीत कराचा भरणा करावा, या संदर्भात घंटागाडी, ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर बसवून जनजागृती देखील केली जात आहे. कर्मचारी घरोघरी देखील जात आहे. मालमत्ता कराची थकीत रक्कम भरणा न करणाऱ्या मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उद्दिष्ट आणि वसुलीत मोठी तफावत
हिंगोली नगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात सहा कोटी २४ लाख ३९ हजारांचा मालमत्ता कर तर तीन कोटी ४ लाख ८२ हजारांची पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पथक थकीत वसुली करीत आहे. हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने चालू आर्थिक वर्षात १५ जानेवारीपर्यंत २ कोटी ६३ लाख ५० हजार रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.
तसेच नगरपालिकेच्या पथकाने चालू आर्थिक वर्षात १५ जानेवारीपर्यंत ७२ लाख रुपयांची थकीत पाणीपट्टी वसुली केली आहे. ज्या नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा केला नाही, अशा थकबाकीदार नागरिकांना २४ टक्के दर साल दर शेकडा व्याज आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन मुख्याधीकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.