Beed Accident News : सोलापूर-धुळे हायवेवर धावता ट्रॅक पेटला! २५ टन सोयाबीन जळाल्याने २७ लाखांचे नुकसान

ही घटना गुरुवारी नरसिंह साखर कारखान्याजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गांवर घडली.
25 tons of soybeans along with the truck were burnt in a fire On Solapur Dhule National Highway
25 tons of soybeans along with the truck were burnt in a fire On Solapur Dhule National Highway
Updated on

येरमाळा ता.६ : गेवराई (जि.बीड) येथुन सोलापूर बाजार पेठेत सोयाबीन भरुन चाललेल्या बारा टायर ट्रकच्या टायरने पेट घेऊन लागलेल्या आगीत ट्रकसह पंचवीस टन सोयाबीन जळून खाक झाले. या दुर्घटनेत सत्तावीस लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी नरसिंह साखर कारखान्याजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गांवर घडली.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाशी पोलीस ठाणे हद्दीतील नरसिंह साखर कारखान्याजवळ घडली.बहिरवाडी (ता.जि.बीड) येथील ट्रॅकचालक मालक भागवत बाबासाहेब मईन हे आपल्या बारा टायर ट्रॅक क्र. एम.एच.२० डी.ई.५०६६ मधुन गेवराई येथील व्यापाऱ्याचे २५ टन सोयाबीन घेऊन सोलापूर बाजार पेठेत विक्रीसाठी घेऊन जात असताना सोलापूर धुळे महामार्गावर वाशी तालुक्यातील नरसिंह साखर कारखान्याजवळ आला असता गाडीच्या मागच्या बाजूचे टायर पेटल्याचे लक्षात आले.

गाडी थांबवली जवळ आग विझवण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने आगीने कांही वेळातच पेट घेऊन ट्रकसह ट्रक मधील सोयाबीन ही पेटले. त्याच वेळी वाशी पोलीस ठाण्याची मोबाईल व्हॅन येथुन जात असताना सदरील प्रकार पाहुन सपोनि के.पी.टोरगे यांनी कळंब अग्निशामक विभागाला संपर्क करुन आग विझवण्यासाठी तात्काळ पाचारण केले.

पेटलेल्या ट्रकमुळे इतर वाहनाच्या सुरक्षेसाठी यावेळी सोबत असलेले पोउपनि आर.बी.घुले. पोहे कॉ, नवनाथ सुरवसे, बंडू दुधाळ यांना सांगून रस्त्यावरील वाहतूक खानापूर पाटी ते नरसिंह कारखाना दुभाजका पर्यंत ऐकेरी वळवण्याचे काम केले. अग्निशामक बंब येई पर्यंत ट्रकने सोयाबीन मालाने चांगलाच पेट घेतला होता. अग्निबंब येऊन आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत ट्रक पूर्ण जळून खाक झाला होता तर सोयाबीनचे पोते जळून सोयाबीन ऐंशी टक्के जळाले.

ट्रक चालक मालक भागवत मईन यांनी सोयाबीन मालाची बिल्टी सोबत दिली नसल्याने सोयाबीन माल मालकाचे नाव सांगता येत नाही असे सांगितले पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या नंतर तुम्हाला नाव सांगतो असे सांगितले.

आग विझवल्या नंतर पूर्णपणे जळालेला ट्रकचा सांगडा जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करुन जळालेल्या सोयाबीनचा मालाचा ढिगारा जेसीबीने टिप्पर मध्ये भरून बाजूला करण्याचे काम चार वाजेपर्यंत चालू असल्याने या ठिकाणची महामार्गवरील ऐकेरी केलेली वाहतूक चार वाजेनंतर पूर्ववत करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.