पोलिसांनी सदरील गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत सुमारे ५० लाख रुपये असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे
वसमत (हिंगोली): कर्नाटकातून वसमत येथे विक्रीसाठी आलेला ५० लाख रुपयांचा वजीर गुटखा शनिवारी (ता. २१) दुपारी साडे तीन वाजता पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात कंटेनर चालकाची कसून चौकशी केली जात आहे. बेंगलोर येथून हा गुटका वसमत येथे आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होऊ लागले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातून एका कंटेनरमध्ये ५० बोरी गुटका वसमत शहरात आज सकाळी आला होता. सदरील कंटेनर वसमत ते परभणी मार्गावर उड्डाणपुलाच्या खाली थांबला होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक विलास खारडे, जमादार भगीरथ सवंडकर, साईनाथ कंठे, प्रशांत मुंडे, बालाजी जोगदंड, दिलीप पोले यांच्या पथकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कंटेनर उभ्या असलेल्या ठिकाणी भेट दिली.
यावेळी पोलिसांनी चालक परवेज पाशा याची चौकशी केली. कंटेनर मध्ये काय आहे याची माहिती विचारली असता त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर उघडून पाहिले असता त्यात वजीर गुटख्याच्या ५० बोऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी सदरील गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत सुमारे ५०लाख रुपये असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी चालक परवेज पाशा याची चौकशी सुरू केली असून हा गुटखा बेंगलोर येथून कोणत्या भागातून वसमत येथे आणण्यात आला होता. तसेच वसमत येथे गुटखा नेमका कोणाकडे आणण्यात आला याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे हिंगोली ते कर्नाटक असे गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.