मायेचा निवारा ...आणि माणुसकीची प्रचिती

NND09KJP04.jpg
NND09KJP04.jpg
Updated on

नांदेड : कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाऊननंतर अनेक नागरिक रोजगारासाठी इतर राज्यातून नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये अडकलेले होते. या अवस्थेत जिल्हाबंदी आणि राज्याच्या सीमभाग प्रवेशसाठी बंद झाल्याने या ७३ नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली.

परराज्यातील नागरिकांना आश्रय
किनवटमध्ये दोन निवारागृहांमध्ये सोय केली असून यामध्ये इतर राज्यातून एकूण ७३ व्यक्ती आश्रयाला आहेत. शिवाजी मंगल कार्यालयात राजस्थानमधील ३६ व गुजरातमधील दोन तसेच दुसऱ्या निवारागृह हे शासकीय आश्रम शाळांमध्ये तयार केले आहे. या ठिकाणी ३३ नागरिकांची सोय यामध्ये करण्यात आली आहे. ठिकाणी राजस्थानमधील दोन, बिहारमधील सात,  उत्तर प्रदेशमधील तीन आणि मध्यप्रदेशमधील २१ अशा विविध राज्यातील नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

जेवन, नास्ता अाणि फळे
दोन्ही निवारागृहांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा - नाश्ता तसेच स्वयंसेवी संस्थांकडून फळे पुरवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिनचर्यामध्ये सकाळी योगाचे प्रशिक्षण वर्ग दररोज घेतले जातात. या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही निवारागृहाच्या ठिकाणी फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले आहे. व्यक्तींना मानसिक आधार मिळावा म्हणून प्रशिक्षीत समुपदेशका मार्फत यांचे समुपदेशनही केले जात आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये एकलेपणाची भावना येऊ नये, तसेच मनोरंजनाची सुविधा म्हणून टीव्ही बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या ७३ जणांची आरोग्य तपासणी वेळोवेळी केली जात आहे. 

नागरिकांच्या आरोग्याची काळजी
आरोग्याच्या बाबतीतही किनवट प्रशासन जागरूकतेने व आस्थेने लोकांना काळजी घेत आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी देखील त्यांच्या सेवेत तत्पर आहेत. या नागरिकांपैकी मोहम्मद शकील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की ‘सर्व व्यवस्था उत्तम केले असून आमची खूप छान काळजी घेतली जाते. स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य तपासणी करून आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, असे त्यांनी सांगीतले. 

गरजूंना मायेचा निवारा
माणूस कितीही बदलला, प्रगत झाला तरी माणसातील माणूसपणाची संवेदना आजही जागृत आहे. तीच संवेदना घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाअंतर्गत किनवट प्रशासनानी या नागरिकांची ज्याप्रकारे मायेने आणि आपुलकीने व्यवस्था केली यावरून असे म्हणता येईल की प्रशासनाचा मानवी चेहरा संवेदना जपत जबाबदारीने काम करत आहे. तसेच गरजूंना मायेचा निवारा व माणुसकीची प्रचितीच देत आहे.
- मीरा ढास
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.