Bidkin : पंढरपुरातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीत पडून 80 वर्षाच्या आजीबाई गंभीर जखमी

समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीमुळे सगळ्या रोडवर गड्डेच गड्डे व चिखलाचे साम्राज्य झाले.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar Newsesakal
Updated on
Summary

रात्री जुन्या बसस्थानक परिसरातून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडलगत समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या २० फूट नालीत पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

-रविंद्र गायकवाड

बिडकिन : बिडकीन परिसरातील (Bidkin) जलवाहिनीच्या कामासाठी शेकटा फाटा ते निलजगाव फाटा हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद करून बस स्थानकाचेही बाजार तळात स्थलांतर करण्यात आले आहे. पैठण, तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) वरून येणाऱ्या प्रवाशांना गावात येण्यासाठी नवीन बस स्थानकापासून किमान अर्धा किलोमीटर पायी यावे लागत आहे.

त्यातच समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीमुळे सगळ्या रोडवर गड्डेच गड्डे व चिखलाचे साम्राज्य झाले असून वयोवृध्द, महिला, नागरिक, शालेय विद्यार्थी आणि नोकरवर्ग यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. पंढरपुरातून (Ashadhi Wari) विठ्ठलाचं दर्शन घेऊन बिडकीन परिसरातील कृष्णापूर येथे घरी जात असलेल्या ८० वर्षीय गयाबाई लक्ष्मण बोडखे या आजीबाई काल रात्री जुन्या बसस्थानक परिसरातून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडलगत समांतर जलवाहिनीसाठी खोदलेल्या २० फूट नालीत पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

Chhatrapati Sambhajinagar News
Sarfaraz Khan In Ind Vs Eng : अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळाली संधी

बसस्थानक परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेत आजीबाईंना तात्काळ नालीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे यांनी प्रथमोपचार केले. आजीबाई गंभीर जखमी झाल्या असून पायाचे हाड मोडले असल्याने पुढील उपचारासाठी नातेवाईकांच्या वतीने रात्री उशिरा खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, नातेवाइकांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा पवित्र घेतला आहे. बिडकिन व परिसरात जलवाहिनीच्या नालीत पडून मृत्यू व गंभीर जखमी झाल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com