येत्या काही दिवसात खरीप हंगामाची सुरवात होणार आहे. तसेच सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात तसेच जिल्हयात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाकडाऊन झालेले आहे.
हिंगोली : कृषी निविष्ठांच्या तक्रारीच्या निवारणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली आहे.
येत्या काही दिवसात खरीप हंगामाची सुरवात होणार आहे. तसेच सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात तसेच जिल्हयात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाकडाऊन झालेले आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके यांचा गुणवत्ता पुर्ण व पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्याच्या दृष्टीने पुर्व तयारी सुरु आहे. त्यामध्ये बियाणे, खते व किटकनाशके यांच्या पुरवठयाबाबत शेतकरी कंपनी प्रतिनिधी बियाणे खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेळ्या अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.
त्याच बरोबर सध्या कोव्हिड-१९ च्या प्रार्दुभावामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन प्रक्रीया वाहतूक वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात व त्यामुळे कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट विचारात घेऊन कृषी निविष्ठांच्या संबंधितच्या अडचणी, तक्रारी निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येईल. शेतकरी तसेच कंपनी प्रतिनिधी कृषी निविष्ठा विक्रेते वितरक यांनी आपल्या अडचणी संबंधित नियंत्रण कक्षात संपर्क करावा किंवा आपल्या तक्रारी dsachingoli@gmail.com व adozphingolil@gmail.com या मेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, हिंगोली श्री कि. डी. लोखंडे व कृषी विकास अधिकारी एन.आर कानवडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.