Jalna Crime : अत्याचार, मारहाण करून मुलीस रस्त्यावर फेकले, जालन्यात संतापजनक प्रकार; पाच जण ताब्यात

Jalna Crime : एका नऊवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री समोर आला.
Jalna Crime
Jalna Crimesakal
Updated on

जालना: एका नऊवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री समोर आला. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, एक संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे. घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी हा अत्याचार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चंदनझिरा पोलिस ठाण्यात संशयितांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान, मुलीची प्रकृती स्थिर असून, तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नागरिक रस्त्यावर

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिकांनी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर काही काळा रास्ता रोको आंदोलन केले. त्यात आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शिवसेना युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह अन्य राजकीय पदाधिकारीही सहभागी

झाले होते. आंदोलकांत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहनांची दूरपर्यत रांग लागली होती. मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ‘चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे’ आदी घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

‘त्याला कडक शिक्षा करा’

आमदार गोरंट्याल म्हणाले, ‘नराधमाने गुंगीचे औषध पाजून मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला बाहेर फेकून दिले. ज्याने कुणी हे कृत्य केले आहे त्याचे पोलिसांनी बदलापूरसारखे एन्काउंटर करून टाकावे, किंवा त्याला आमच्या हाती द्यावे. आम्ही त्याचा निर्णय घेऊ. या बदल्यात आम्हाला फाशी झाली तरी चालेल, पण त्याला सोडू नका.

दरम्यान, मुलीवर अत्याचार आणि मारहाण करून फरारी झालेल्या तरुणाच्या पोलिसांनी वीस तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आदित्य सुभाष जाधव (वय १९, रा. मातोश्रीनगर, चंदनझिरा, जालना) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक पंकज जाधव, योगेश उबाळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार सॅम्युअल कांबळे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, दीपक घुगे आदींनी ही कारवाई केली आहे.

संबंधित मुलगी रात्री उशिरापर्यंत बेपत्ता असल्याची एक तक्रार मिळाली. ती सापडल्यानंतर अत्याचार करून तिला मारहाण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे.

- अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक

Jalna Crime
Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; विवस्त्र करून मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.