Ram Randir Ayodhya : बीड येथे पणत्यांतून साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिकृती

मंदिरांची स्वच्छता; अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध उपक्रम,अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर पुणे येथील चित्रकार उद्देश पघळ यांनी पणत्यांतून ५० बाय ७० फुटांची श्रीरामाची सुरेख प्रतिकृती साकारली.
beed
beedkal
Updated on

बीड : अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर पुणे येथील चित्रकार उद्देश पघळ यांनी पणत्यांतून ५० बाय ७० फुटांची श्रीरामाची सुरेख प्रतिकृती साकारली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यासाठी पुढाकार घेतला. रविवारी (ता. २१) उत्सवाच्या पूर्व संध्येला या प्रतिकृती भोवती दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिपोत्सावासाठी सायंकाळी पावणे सात वाजता उपस्थितीचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले. दुपारी १२ वाजता खासदार डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, मुख्याधिकारी नीता अंधारे आदींच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे.

श्री क्षेत्र रामगड, सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जिल्हा भाजपतर्फे परिसरातील श्री क्षेत्र रामगड तसेच शहरातील श्री सोमेश्वर महादेव मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रामगडाचे मठाधिपती स्वामी योगीराज महाराज, प्रा. देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, गणेश पुजारी, शांतिनाथ डोरले, बालाजी पवार, बाळासाहेब गात, सुरेश माने, बद्रीनाथ जटाळ माजी सरपंच रामभाऊ बांड, राकेश बिराजदार, कल्याण पवार आदी सहभागी झाले. सोमेश्वर मंदिर येथे श्री. मस्के यांच्यासह मंदिराचे विश्वस्त नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, दत्ता थिगळे, बालाजी पवार, बाबूराव परळकर, पांडुरंग जानवळे, प्रधान पवार, बाबासाहेब शिंदे आदींनी सहभाग घेतला होता.

beed
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर उत्सवाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील

उद्या बीडमध्ये भव्य शोभायात्रा

बीड : अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्ला मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या लोकार्पणानिमित्त सध्या शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या निमित्त सोमवारी (ता. २२) शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. शहरातील श्री बालाजी मंदिर ते श्री जलाराम मंदिरापर्यंत ही शोभायात्रा असेल. सकाळी आठ वाजता शोभायात्रेचा प्रारंभ पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करुन होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, शहर पोलिस ठाणे, डी. पी. रोड या मार्गाने मार्गस्थ होऊन गुजराथी कॉलनी येथील श्रीराम दरबार श्री जलाराम मंदिरापर्यंत शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत अश्व पथक, लेझीम पथक, ढोलपथक, टाळकरी, विणेकरी, शाळकरी मुले, कलशधारी महिला भगिनी, प्रभ श्रीरामांची भव्य मूर्ती, जिवंत देखावे असतील. शोभायात्रा श्री जलाराम मंदिरात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी महाआरती होणार आहे. त्यानंतर सर्व रामभक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे.

beed
Ayodhya Ram Mandir : पुण्य पदरात पाडून घेण्याचा उद्या महत्त्वाचा दिवस, श्री राम विराजमान होतील तेव्हा नक्की करा या गोष्टी

अशी आहे संहिता

शोभायात्रेत महिला भगिनींनी लाल रंगाची साडी आणि पुरुष मंडळींनी पांढरा कुर्ता किंवा सदरा परिधान करुन सहभागी व्हावे. सोबत भगव्या रंगाची पट्टी/गमजा/अंगवस्त्र गळ्यात परिधान करावे. स्वच्छता व शिस्तीचे पालन करावे. श्री राम दरबार जलाराम मंदिर परिसरात रांगेत दर्शन घ्यावे. दरम्यान, अयोध्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर करण्यात येणार आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळी आठ ते दुपारी १२ : ३० पर्यंत दुकाने बंद ठेवावीत. सायंकाळी सहा वाजता लोकसहभागातून दीपोत्सव सोहळा होणार आहे. भाविकांनी स्वत: पाच दिवे घरुन आणावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.