Beed Crime : बीडमध्ये खळबळ! गेवराईत आढळून आला एका यूवकाचा संशयास्पद मृतदेह, पाेलिसांचा तपास सुरू

Beed latest Crime News In Marathi | सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल चावार्क पाठीमागील एका पुलाजवळ संजयनगर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
a suspicious body found in Georai police investigation is on beed crime update
a suspicious body found in Georai police investigation is on beed crime updateSakal
Updated on

Beed News : सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल चावार्क पाठीमागील एका पुलाजवळ संजयनगर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

संभाजी हरीभाऊ गायकवाड (वय ३६) संजय नगर,ता गेवराई असे मृत युवकाचे नाव आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चावार्क च्या पाठीमागील पुलाजवळ सिमेंट रस्त्यालगत युवकाचा मृतदेह नागरिकांना दिसून आला.या घटनेची माहीती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळावर दाखल झाले.

मृतदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरील युवकाचा घात की अपघात शवविच्छेदन अवहाल आल्यानंतर आणि तपासानंतर खरा प्रकार उघडकीस येईल असे गेवराई पोलिसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.